HW News Marathi
राजकारण

अनिल अंबानी मोठ्या आर्थिक संकटात, दोन कंपन्यांच्या खात्यात १९ कोटी

मुंबई | उद्योगपती अनिल अंबानी राफेल डील घोट्यामुळे सध्या चर्चेत आहेत. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) व रिलायन्स टॉवर्स या दोन कंपन्यांच्या १४४ खात्यांत फक्त १९ कोटी ३४ लाख आहेत. अमेरिकन टॉवर्स कंपनीच्या (एटीएल) प्रकरणात रिलायन्सने दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे.

बोस्टनच्या अमेरिकन टॉवर कॉर्पने अनिल अंबानी यांच्या आरकॉमवर २३० कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. त्यावरील याचिकेवर उत्तर देताना रिलायन्सने कोर्टात ही माहिती दिली आहे. त्या वेळी कंपनीच्या डोक्यावर ४६ हजार कोटींचे कर्ज आहे.रिलायन्स कम्युनिकेशन्स वायरलेस दूरसंचार क्षेत्रात कार्यरत होती. परंतु भरमसाठ तोट्यामुळे कंपनीने व्यवसाय बंद केला आहे. त्यासाठी हायकोर्टात दाखल याचिकेवरील सुनावणीदरम्यान आरकॉमने दिलेल्या प्रतिज्ञापत्रात कंपनीच्या खात्यात अत्यल्प पैसे असल्याचे उघड केले आहे.

आरकॉमच्या एकूण ११९ बँक खात्यांमध्ये १७ कोटी ८६ लाख रुपये आहेत. रिलायन्स टॉवर्स या उपकंपनीच्या २५ खात्यांत १ कोटी ४८ लाख आहेत. दोन्ही मिळून कंपनीच्या खात्यात फक्त १९ कोटी ३४ लाख आहेत. त्यामुळेच एटीएलच्या २३० कोटींची थकबाकी देणे शक्य नाही, असे कंपनीने म्हटले आहे. कर्जपरतफेडीसाठी आरकॉमने त्यांच्या मालमत्तेची रिलायन्स जिओला १८ हजार कोटींना विकण्याचा निर्णय घेतला होता. रिलायन्स जिओची तयारीही अंतिम टप्प्यात होती, पण त्याच वेळी एरिक्सन कंपनीने ५५० कोटींच्या वसुलीसाठी या व्यवहाराविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझी काहीही तक्रार नाही, एका माजी मुख्यमंत्र्याशी असे बोलणे योग्य नव्हते !

News Desk

नाशिक पदवीधर मतदारसंघात ‘या’ तांबेंनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज; राजकारणात एकच खळबळ

Aprna

साध्वी प्रज्ञा यांनी केला पक्षाची शिस्त पाळण्याचा संकल्प

News Desk