HW News Marathi
राजकारण

अण्णा हजारेंची प्रकृती बिघडली, यकृतावर परिणाम

मुंबई | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. दरम्यान, या उपोषणामुळे अण्णा हजारेंची प्रकृती बिघडली आहे. अण्णा हजारेंच्या यकृतावर परिणाम झाला असून आता त्यांना रक्तदाबाचाही त्रास होऊ लागला आहे. त्यांचे उपोषण असे सुरु राहिले तर त्यांच्या किडनी आणि मेंदूवर देखील याचा वाईट परिणाम होईल, अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

अण्णा हजारेंनी ३० जानेवारीपासून लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठीच्या आंदोलनाला सुरुवात केली असून आज (३ फेब्रुवारी) त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. राळेगणसिद्धी या आपल्या गावी अण्णा हजारेंच्या बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली. मात्र, या उपोषणाकडे सरकारकडून केल्या जाणाऱ्या दुर्लक्षामुळे अण्णा हजारेंच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त व चिंतामुक्त करणार !

News Desk

“जे गेले त्यांच्याबद्दल… “; कीर्तिकारांच्या शिंदे गटाच्या प्रवेशावर पेडणेकरांची प्रतिक्रिया

Darrell Miranda

“महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात कायदा सुव्यवस्थेसाठी केंद्रीय सुरक्षा दल पाठवा”, संजय राऊतांची मागणी

Aprna