June 26, 2019
HW Marathi
मनोरंजन महाराष्ट्र राजकारण

पायल रोहतगीचे शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त ट्वीटनंतर माफी, म्हणे भारतात स्वातंत्र्यच नाही

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी गेल्या अनेक दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. पायलने यापूर्वी नथुराम गोडसे, सतीप्रथा आणि सनातन संस्था यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केली आहे. आता पायलने  महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त ट्वीट केले आहे. वादग्रस्त ट्विट आणि व्हिडिओ केले आहे. “शिवाजी महाराज हे मूळ क्षत्रिय कुळाचे नसून, त्यांचा जन्म एका क्षुद्र जातीच्या शेतकरी कुटुंबात झाला होता”, असे वादग्रस्त ट्वीट पायलने केले आहे. तिच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटले आहे. पोस्टमुळे सोशल मीडियावर एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.

पायलने आज (३ जून) या पोस्टमुळे सोशल मीडियावर एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिवाजी महाराज हे मुळचे क्षत्रिय नसून ते शुद्र जातीत जन्माला आले होते, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. शिवाय मराठा आरक्षणावरही आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण का दिले? असा थेट सवालही तिने केला आहे.

दोन दिवसांपूर्वी १ जूनला पायलने ट्विटरच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा एक फोटो पोस्ट केला. या फोटोखाली तिने “शिवाजी महाराज हे मूळ क्षत्रिय कुळाचे नाहीत. त्यांचा जन्म एका क्षुद्र जातीच्या शेतकरी कुटुंबात झाला आहे”, असे या ट्विटमध्ये म्हंटल आहे. ट्विटर आणि इनस्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे. या वादग्रस्त ट्वीट आणि व्हिडिओनंतर पायलच्या कुटुंबियांना धमक्याचे फोन आणि तिला ट्वीटवर ट्रोल केले.

यानंतर पायलने पुन्हा फेसबुक अकाऊंटला एक व्हिडिओ पोस्ट करत याबद्दल माफी मागितली आहे. तिने माफी मागताना म्हटले आहे की, मी हात जोडून सगळ्यांची माफी मागते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी मी काही गोष्टी वाचल्या होत्या आणि त्यामुळेच माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले होते. मी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रचंड मानते. त्यांचे पूजन करते. पण मला त्यांच्या संबंधित एक प्रश्न पडला होता. त्याचेच उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न केला.

पण यानंतर माझ्या लक्षात आले की, सोशल मीडियावर केवळ त्वेष निर्माण करणारी लोके आहेत. पण तरीही मी हात जोडून माफी मागते. पण ही माहिती योग्य असती तर सनातन धर्म किती महान आहे हे सगळ्यांना कळले असते. पण माझ्या प्रश्नांचे उत्तर देण्यापेक्षा माझ्यावर खूप वाईट पद्धतीने टीका करण्यात आली. आपल्याकडे एखादी व्यक्ती सत्य जाणून घ्यायचा प्रयत्न करत असेल तर त्याला मदत केली जात नाही. मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अभ्यास करण्याचा, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण या सगळ्यातून भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाहीये असेच मला जाणवले.

 

Related posts

दानवेंच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या मदतीला पवारांचा हात

Kiran Yadav

गोरक्षणाच्या नावावर माणसं मारणाऱ्यांना कठोर शिक्षा करा – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

News Desk

आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन

News Desk