Site icon HW News Marathi

मूळ शिवसैनिक म्हणून एकनाथ शिंदेंना भेटणार! – किशोरी पेडणेकर

मुंबई | “मूळ शिवसैनिक आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना भेटणार आहे. यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार आहे, असे माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी दादर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर माध्यमांशो बोलताना सांगितले. पोलिसांनी पेडणेकरांना आज (1 नोव्हेंबर) झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांत सर्व सामान्य नागरिकांच्या सदनिका हस्तगत केल्याप्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावला होता. या पार्श्वभूमीवर पेडणेकर आज चौकशीसाठी हजर झाल्या होत्या. पोलिसांनी पेडणेकरांची अडीच तास चौकशी केली.

 

यानंतर पत्रकारांनी किरीट सोमय्यांचे आरोपवर प्रश्न विचारल्यावर पेडणेकर म्हणाल्या, “मला त्यांच्या आरोपाला उत्तर द्याचे नाही. मी कायद्याची लढाई लढते. मी कायद्यांनीच सगळे येईल, मी उत्तर देणार नाही.  तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात, असा प्रश्न पत्रकारांनी पेडणेकरांना विचारल्यावर त्या म्हणाल्या, “मी निरोप दिलेला आहे. मला जेव्हा त्यांचा वेळ मिळेल, मी माझे निवेदन घेऊन जाणार आहे. निवेदनावर मूळ शिवसैनिक आहेत. मूळ शिवसैनिक आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मी त्यांना भेटणार आहे. यानंतर गृहमंत्र्यांना भेटणार आहे. आणि त्यांना भेटण्याचा माझा हक्क आहे.”

 

आरोपात 10 टक्के ही सत्य नाही

 

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “एका पक्षाच्या वरिष्ठ नेता आणि माजी खासदारांनी आरोप केलेले आहेत. प्रत्येक आरोपाला उत्तर दिलेच पाहिजे यांची गरज नाही. पोलिसांचे जेव्हा मला बोलविणे आले, तेव्हाच मी पोलिसांना सांगितले होते की, मी तीन दिवस व्यस्त आहे. यानंतर मी येईल येणार, ती बातमी खोटी चालविली होती. कर नाही तर त्याला ठर कशाला, अशी म्हण आहे मी ती कायम ठेवली आहे. मी पोलीस चौकशीला आले, मी अडीच तास चौकशी केली. यादरम्यान, पोलिसांनी जे प्रश्न विचारले, त्या प्रश्नाचे मला माहित असलेले मी उत्तर दिले. त्यामुळे ज्या पद्धतीने हे रंगविले जात आहे. त्या आरोपात 10 टक्के ही सत्य नाही.”

 

साप म्हणून दोरी बडवण्याचा प्रकार सुरू

 

तुमचे संजय अंधारे यांच्यासोबतच्या व्हॅट्सअप चॅट असल्याच्या चर्चा वारंवार होत आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचाल्यावर पेडणेकर म्हणाल्या, “अगदी सगळ्या पक्षातील नेते, मी महापौर माझ्या पक्षात असलेल्यांशी सर्वांची संबंध येत असतात. मला चॅट करू शकता. पण, मी ते चॅट वाटले का?, माझा रिप्याल आहे का?, मला असंख्य चॅट आल्यानंतर प्रत्येक चॅट वाचल्या जात नाहीत. मला कोणता चॅट मी उघडलाही नाही. मी वाचलाही नाही, तो त्या त्यांनी दाखविला तो त्यांनी चॅट केला आहे. मी त्याला काही रिप्लाय दिलेला नाही. उगाच साप म्हणून दोरी बडवण्याचा प्रकार सुरू आहे.”

 

Exit mobile version