Site icon HW News Marathi

“…गिरीश महाजनांचे रडणे तर अजूनही थांबले नाही,” अजित पवारांची मिश्किल टीका

मुंबई | एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाची घोषणा होताच गिरीश महाजन यांचे रडणे तर अजूनही थांबले नाही. फेटा बांधायला दिला. तर तो फेटा सोडतात आणि डोळ्याचे पाने पुसण्यास वापरतात, अशी मिश्किल टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर समर्थकांवर केली आहे. राज्यात विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आली आहे. विधानसभेच्या आजच्या (3 जुलै) अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर अध्यक्षांच्या अभिनंदाचा प्रस्तावावर बोलताना अजित पवारांनी भाजप आणि शिंदे गटावर टीकास्त्र सोडले.

अजित पवार म्हणाले, “एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्याची घोषणा होताच एकदम पीन ड्रॉप सायलन्स झाला. भाजपच्या अनेक लोकांना ढसाढसा रडायला लागले. कोणाला काहीच कळत नव्हते. कारण संपूर्ण महाराष्ट्राला शॉक होता. गिरीश महाजन यांचे रडणे तर अजूनही थांबले नाही. फेटा बांधायला दिला. तर तो फेटा सोडतात आणि डोळ्याचे पाने पुसण्यास वापरतात. ते सर्वाधिक वाईट वाटले असून पण आता काय करता.”

तुमच्याकडे आमच्याकडचे लोक जास्त 

“मी जेव्हा समोर पाहिले तर माजूला भाजपवाल कमी दिसत आहेत. तुमच्याकडे आमच्याकडचे लोक जास्त दिसत आहेत. मला मूळ भाजपवाल्यांचे वाईट वाटत आहे. पहिली लाईन पाहिली तर तुम्हाला लक्ष्यात येईल. गणेश नाईक, उदय सामंत, बबन पाचपुते, रादाकृष्ण विखे पाटील हे पहिल्या लाईनमध्ये आहेत. आमचे येथून तुमच्याकडे गेलेले दीपक केसरकर तर आज भारी प्रवक्ते झाले असून आम्ही शिकवलेले कुठे वाया गेले नाही हे आज दिसून आले,” असे अजित पवार आभिनंद प्रस्तावच्या वेळी बोलत होते.

 

 

Exit mobile version