HW News Marathi
राजकारण

काँग्रेसची हिमाचल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवारांची यादी जाहीर; माजी आमदाराची सोडचिठ्ठी

मुंबई |  निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh Elections) विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशची विधानसभा निवडणूक एका टप्प्यात होणार असून यासाठी  १२ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ डिसेंबर रोजी हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहेत.  या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मंगळवारी (18 ऑक्टोबर) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यानंतर काँग्रेस पक्षातील नेत्यांनी नाराजी नाट्य सुरू झाले आहे.

दरम्यान, या यादीत काँग्रेसने ४६ उमेदवारांची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे ही यादी जाहीर होताच काँग्रेसचे कुल्लूमधील बंजार मतदारसंघाचे माजी आमदार आदित्य विक्रम सिंह यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आदित्य विक्रम सिंह हे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. परंतु, आदित्य विक्रम सिंह  त्यांच्याकडून याबद्दल अद्याप घोषणा केलेली नाही. २०१७ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून आदित्य विक्रम सिंह मैदानात उतरले होते. परंतु, आदित्य विक्रम सिंह यांना पराभव सामना करावा लागला आहे.

एका बाजूला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची देशभरात ‘भारत जोडो’ यात्रा सुरू आहे. या यात्रेद्वारे राहुल गांधी देशभरात पायी चालून लोकांना सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच दुसरीकडे हिमाचल प्रदेशमध्ये उमेदवारांची जाहीर होताच बंडखोरीचे वारे वाहू लागले आहे.

काँग्रेसने जाहीर केलेली यादीत कुणाची नावे?

काँग्रेसचे माजी प्रदेशध्यक्ष सुखविंदर सिंग सुखू आणि कुलदीप सिंग राठौर यांना नादौन आणि थिओगमधून उमेदवारी मिळाली आहे. माजी राज्यमंत्री आणि माजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) सचिव आशा कुमारी यांना त्यांच्या डलहौसी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, किन्नौरमधून पक्षाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. सध्या जगतसिंग नेगी हे किन्नौरचे काँग्रेसचे आमदार आहेत. येथून हिमाचल प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष निगम भंडारी यांनाही पक्षाने तिकीट मिळण्याची शक्यता आहे. उमेदवारांच्या पहिल्या यादीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह यांच्या नावाचा समावेश नाही. त्या माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी आहेत. उर्वरित २२ उमेदवारांची नावे लवकरच जाहीर केली जातील, असे काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मुनगंटीवारांनी केले मोठे विधान

Aprna

मराठा आरक्षणाबाबत बाहेर घोषणा करण्यापेक्षा सभागृहात विधेयक आणा !

News Desk

“अजित पवारांनी कोणत्या पुराव्यांच्या आधारे विधान केले, ‘ते’ सांगावे”, संभाजीराजेंचा सवाल

Aprna