HW News Marathi
राजकारण

भाजपाचे आमदार अॅड. आशिष शेलार यांना मातृशोक

मुंबई | मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या आई मीनल बाबाजी शेलार यांचे रविवारी सकाळी ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 70 वर्षांच्या होत्या. सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यापुर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

मीनल शेलार त्यांच्या पश्चात आमदार आशिष शेलार आणि भाजपा उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष विनोद शेलार अशी त्यांना दोन मुले व एक मुलगी तसेच जावई नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अत्यंयात्रा हायलँन्ड कोर्ट, बजार लेन, रंगशारदा हॉटेल जवळ असलेल्या त्यांच्या राहत्या घरापासून रविवारी 4 वाजता निघेल. या नंतर सांताक्रूझ पश्चिम येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आशिष शेलार यांच्या आईच्या निधनाचे वृत्त कळताच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे, आमदार पराग अळवणी यांच्यासह भाजपाच्या अनेक पदाधिका-यांनी रूग्णालयात जाऊन आमदार अॅड. आशिष शेलार यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार यांची भाजप सरकारवर सडकून टीका

Gauri Tilekar

रामदास कदम उद्धव ठाकरेंचा कुत्रा, नितेश राणेंची जहरी टीका

News Desk

कॉंग्रेसचे माजी मंत्री सीपी जोशींनी केली पंतप्रधान मोदींवर जातीय टिका

News Desk