HW News Marathi
राजकारण

अशोक गेहलोत राजस्थानचे नवे मुख्यमंत्री

जयपूर | काँग्रेसचे अशोक गेहलोत यांची अखेर राजस्थानच्या मुख्यमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन मोठ्या राज्यांमध्ये काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. परंतु, राजस्थानच्या मुख्यमंत्री पदासाठी कोणाचे नाव निश्चित करावे यावरून पेच निर्माण झाला होता. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट हे दोघेही मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार होते. या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी आक्रमक पवित्र घेत राज्यातील प्रदेश कार्यालयासमोर बुधवारी (१२ डिसेंबर) जोरदार घोषणाबाजी करून शक्तिप्रदर्शन केले.

दरम्यान, राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा राज्यात सुटण्याची शक्यता दिसत नसल्याने बुधवारी (१२ डिसेंबर) झालेल्या राज्य काँग्रेसच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचा निर्णय काँग्रेस हायकमांडकडून घेतला जाईल, असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. सचिन पायलट आणि अशोक गेहलोत हे दोघेही आपापल्या मतदारसंघातून चांगल्या मताधिक्क्यांनी निवडून आले असल्याने राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदावर या दोघांनीही दावा केला होता. मात्र, अंतिम निर्णय हा अशोक गेहलोत यांच्या बाजूने लागला असून ते राजस्थानचे नवे मुख्यमंत्री ठरले आहेत.

“सचिन पायलट यांनी राजस्थान विधानसभा निवडणुकांसाठी प्रचंड कष्ट केले आहेत. त्यामुळे जर सचिन पायलट यांना राजस्थानचे मुख्यमंत्री केले नाही तर आपण काँग्रेस पक्षातून बाहेर पडणार”, असा इशारा राजस्थानातील आमदार पी. आर. राणा यांनी दिला होता. त्याचसोबत, “आत्तापर्यंत गेहलोत यांनी काय केले ?”, असा सवालही राणा यांनी केला होता. “राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी सचिन पायलट यांनी केलेल्या कष्टाचे फळ त्यांना मिळालेच पाहिजे. राजस्थानात निम्म्याहूनही अधिक आमदारांचे सचिन पायलट यांना समर्थन आहे. त्यामुळे तेच राजस्थानचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत”, असेही पी.आर.राणा यांनी स्पष्ट केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जयंत पाटील यांच्या स्वागताला हजारो कार्यकर्ते रस्त्यावर! नियम तोडले म्हणून मंत्र्यांवर गुन्हे दाखल करणार का?

News Desk

तृणमूल काँग्रेसने फेटाळला ममता बॅनर्जींचा राजीनाम्याचा प्रस्ताव

News Desk

देशात ६० वर्षांमध्ये काही झालेच नसते, तुम्ही सोशल मीडियातून खोटा प्रचार कसा केला असता !

News Desk