HW News Marathi
राजकारण

गेहलोत यांच्याकडे सोपविली जाणार काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी ?

नवी दिल्ली | लोकसभेत झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत ठेवला होता. दरम्यान, कार्यकारिणीच्या सदस्यांकडून जरी हा राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला असला तरीही राहुल गांधी मात्र आपल्या राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम असल्याची माहिती मिळत होती. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांच्याकडे सोपविली जाणार असल्याची माहिती शक्यता वर्तविण्यात येत आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तनुसार, काँग्रेसच्या अध्यक्षपदी लवकरच नव्या व्यक्तीची नियुक्ती होणार आहे. तसेच काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत यांचे नाव जवळपास निश्चित झाले असून केवळ याबाबतची औपचारिक घोषणा बाकी असल्याचे देखील म्हटले जात आहे. काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीच्या सदस्यांकडून राहुल गांधी यांचा राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला असला तरीही राहुल गांधी आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे, पुढचा काँग्रेस अध्यक्ष हा गांधी घराण्याचा नसावा अशीही स्पष्ट मागणी राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ये दोस्ती आगे भी चलती रहेगी’, तेजस्वी यादव यांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Aprna

“हिंमत असेल तर शिंदे गटात गेलेल्यांविरोधात बोलून दाखवावे”, अनिल परबांचे किरीट सोमय्यांना आव्हान

Aprna

“परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मराठवाड्यात या”, धनंजय मुंडेंची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भावनिक साद

Manasi Devkar