HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

सद्यस्थितीत शिवसेनेसाठी जन आशीर्वाद यात्रा महत्त्वाची नाही !

मुंबई | राज्यात निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून या पूरग्रस्त भागाला विविध क्षेत्रातून, विविध स्तरांतून मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरु आहे. या भागातील पूराचे पाणी देखील आता हळूहळू ओसरले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे येत्या २१ आणि २२ ऑगस्टला पूरग्रस्त गावांचा दौरा करणार आहेत. “सद्यस्थितीत शिवसेनेसाठी जन आशीर्वाद यात्रा महत्त्वाची नाही. सध्या आमचे संपूर्ण लक्ष पूरग्रस्त कोल्हापूर आणि सांगलीकडे आहे”, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

“कोल्हापूर आणि सांगली येथील पूर जरी ओसरला असला तरीही या भागातील साफसफाई आणि पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्याची आता नितांत आवश्यकता आहे. आम्ही त्याला अधिक महत्त्व देत आहोत. सद्यस्थितीत आमच्यासाठी जन आशीर्वाद यात्रा महत्त्वाची नाही. आमचे संपूर्ण लक्ष पूरग्रस्त कोल्हापूर आणि सांगलीकडे आहे”, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. आदित्य ठाकरे हे ठाण्यात एका कार्यक्रमाच्या उदघाटन समारंभात बोलत होते.

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यादरम्यान कोल्हापूरमधील अन्य महत्त्वाचे नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार देखील उपस्थित असतील. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली आहे.राज्य पूरस्थितीचा सामना करत असताना मातोश्रीवर मात्र विधानसभेच्या दृष्टीने पक्षप्रवेशांचे सत्र सुरूच होते. त्यामुळे, सर्व स्तरातून शिवसेनेवर टीका झाली. त्यानंतर आता काहीच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण आदित्य ठाकरेंसोबत पूरग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याचे सांगण्यात आले.

Related posts

लोकसभेसाठी सेना-भाजपची युती होणार ?

News Desk

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन

News Desk

तारापूर अणुऊर्जा प्रकल्प परिसरात तोडफोड

News Desk