HW News Marathi
राजकारण

आजम खान यांनी माझ्यावर अ‍ॅसिड हल्ला करण्याचा कट रचला !

नवी दिल्ली | “समाजवादी पार्टीचे उमेदवार आजम खान यांनी माझ्यावर अ‍ॅसिड हल्ला करण्याचा कट रचला होता”, असा खळबळजनक आरोप उत्तर प्रदेशमधील रामपूर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार जयाप्रदा यांनी केला आहे. यावेळी बोलताना जयाप्रदा यांना आपले अश्रू अनावर झाले. जयाप्रदा यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जयाप्रदा यांनी हे वक्तव्य केले आहे.

“रामपूरमध्ये आजम खान गरिब जनतेवर दबाव टाकतात. जे लोक त्यांना विरोध करतात त्यांना तुरुंगात टाकले जाते. म्हणून माझी रामपूर सोडून जायची इच्छा नव्हती. मला त्या गरिबांसाठी लढायचे होते. मात्र, माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आजम खान यांनी माझ्यावर अ‍ॅसिड हल्ला करण्याचा कट रचला होता”, असे जयाप्रदा यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंदिरातील कार्यक्रमात खाद्यपदार्थांच्या पाकिटातून दारूचे वाटप

News Desk

नायर हॉस्पिटलसमोर डॉ. पायल तडवी यांच्या कुटुंबियांकडून निदर्शने

News Desk

दिव्यांगांच्या कार्यक्रमात भाजपच्या बाबुल सुप्रीयो यांची एकाला ‘पाय तोडण्याची’ धमकी

News Desk