Site icon HW News Marathi

बच्चू कडू यांचा अपघात; पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत

मुंबई | प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांचा अमरावतीत अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. बच्चू कडू यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर खासगी रुगणालयात उपचार सुरू आहेत.  बच्चू कडू आज (11 जानेवारी) सकाळी सहा ते साडे सहा वाजताच्या सुमारात रस्ता ओलांडताना एका अज्ञात दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. बच्चू कडू हे रस्त्याच्या डिव्हायडरवर आदळल्याने डोक्याला मार लागला आहे.

 

दरम्यान, बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि पायाल गंभीर दुखापत झाली आहे. यात बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. बच्चू कडू यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून रुग्णालयात कोणालाही येण्यास परवागी नाही. बच्चू कडू यांनी अपघातानंतर ट्वीट करत आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे.

ट्वीटमध्ये बच्चू कडू म्हणाले, “आज सकाळी रस्ता क्रॉस करताना माझा अपघात झाला. माझी प्रकृती ठीक असुन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला विश्रांतीची गरज आहे. कृपया सर्व हितचिंतकांना विनंती की कोणीही भेटायला येऊ नये.” यापूर्वी आमदार जयकुमार गोरे, आमदार धनंजय मुंडे, आमदार योगेश कदम यांच्या कारचा अपघात झाला होता.

 

 

 

Exit mobile version