HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

‘चिखलफेक’ आंदोलन बाळासाहेबांना नक्की आवडले असते !

कणकवली | उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले आमदार नितेश राणे आणि त्यांच्या १८ कार्यकर्त्यांना जिल्हा सत्र न्यायालयाकडून बुधवारी (१० जुलै) सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. नितेश यांनी केलेल्या या चिखलफेक प्रकरणी त्यांच्यावर सर्वच स्तरांतून मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली असली तरीही नितेश राणे यांनी मात्र पुन्हा एक वादग्रस्त विधान केले आहे. “चिखलफेक आंदोलन कुणाला आवडो न आवडो बाळासाहेब ठाकरेंना नक्कीच आवडले असते”, अशी नितेश राणे यांनी म्हटले आहे.

“हे चिखलफेक आंदोलन अन्य कोणाला आवडो न आवडो परंतु जर आज बाळासाहेब असते तर त्यांना नक्कीच आवडले असते. बाळासाहेब असते तर ते म्हणाले असते कि शाब्बास नितेश, तू चांगले काम केलेस”, असे म्हणत नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या शिवसेनेच्या दीपक केसरकर यांना हा टोला लगावला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर बाहेर येताच नितेश राणे यांनी केलेल्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Related posts

मोदींचे संसदेतील भाषण प्रथेला धरून नव्हते!

News Desk

रोडरोमियो’सारखे आमच्या मागे का लागता ?

News Desk

औरंगाबाद येथे पासपोर्ट कार्यालयाचे २८ मार्च रोजी उद्घाटन

News Desk