HW News Marathi
राजकारण

शदर यादव यांना येते बाळासाहेबांची आठवण

मुंबई | मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयामध्ये शनिवारी २ जुलै रोजी सायंकाळी राजद नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची शरद यादव यांनी भेट घेतली. लालूप्रसाद यादव यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी शरद यादव यांनी एशियन हार्ट इन्स्टिट्यूट (हॉस्पिटल) येथे भेट दिली. जवळपास तासभर ते त्यांच्यासोबत होते. लालू प्रसाद यादव यांची भेट घेतल्यानंतर शरद यादव यांनी एशियन हार्ट इन्स्टिट्यूट (हॉस्पिटल) च्या बाहेर पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना शरद यादव म्हणाले, २०१९ मध्ये सर्व विरोधी पक्षांना एकत्र यावे लागेल. लोक परेशान आहेत. त्रासात आहेत. त्यामुळे भाजप विरोधात देशभर एक महागठबंधन उभे राहील याबाबत त्यांनी विश्वास व्यक्त केला. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांची त्यांनी आठवण केली आणि शिवसेनेशी असलेल्या व्यक्तिगत संबंधांचा उल्लेख देखील केला. त्याचबरोबर मी आणि शरद पवार शिवसेनेशी चर्चा करायला जाऊ शिवसेनेशी आमचे घनिष्ठ संबंध आहेत असेही शरद यादव यावेळी म्हणालेत.

त्यानंतर ते एमसीए क्लब येथे इफ्तार पार्टीत सहभागी झाले. शनिवारी (आज) रात्री महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी त्यांच्या निवास्थानी ९.३० वाजता भेट देणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतल्यानंतर शरद पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले…

Aprna

भाजप प्रवेशानंतर प्रथमच मोहिते-पाटील आणि शरद पवार समोरासमोर येणार !

News Desk

वॅक्स म्युझियममध्ये आता आठवलेंचा पुतळा  

News Desk