HW News Marathi
राजकारण

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर पहिल्या ट्वीटमध्ये बाळासाहेबांची आठवण करत म्हणाले…!

मुंबई | बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही, असे सूचक  ट्वीट शिवसेनेचे बंडखोर नेता एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केले आहे. विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेने बोलविलेल्या बैठकीच एकनाथ शिंदे गैर हजर होते. यामुळे राज्यात राजकीय भूकंप झाला आहे.  एकनाथ शिंदे हे कालपासून (20 जून) नॉट रिचेबल आहेत. यानंतर एकनाथ शिंदे यांनी आज (21 जून) ट्वीट करत शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची आठवण करत कट्टर शिवसैनिक असल्याचे सांगितले.

एकनाथ शिंदे ट्वीटमध्ये म्हणाले, “आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही.” शिंदेंनी पक्षासोबत बंढखोरी केल्यानंतर पक्षाने त्याची गटनेते पदावरून हकालपट्टी केली असून एकनाथ शिंदेच्या जागी अजय चौधरी यांची निवड केली आहे.

संबंधित बातम्या
विधान परिषदेच्या निकालानंतर ‘मविआ’मध्ये मोठा स्फोट; शिवसेनेचे एकनाथ शिंदे नॉट रिचेबल 
एकनाथ शिंदेसह शिवसेनेचे नॉट रिचेबल आमदार गुजरातमधील मेरिडियन हॉटेलमध्ये मुक्कामी
एकनाथ शिंदे हे आमचे जिवाभावाचे सहकारी! – संजय राऊत

 

 

Related posts

#Article370Abolished : लोकसभेत आज कलम ३७० हटविणे आणि जम्मू काश्मीरचे विभाजनचा प्रस्ताव मांडणार

News Desk

सत्ताधार्‍यांना हिंदुत्व आणि राममंदिरही नको झाले !

News Desk

शरद पवारांनी राज ठाकरेंना टूरिंग टॉकीजसाठीची पुढची स्क्रिप्ट दिली

News Desk