HW News Marathi
राजकारण

बाळासाहेबांचे विचार आपल्याला कायम मार्गदर्शन करतील !

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज सहावा स्मृतिदिन आहे. बाळासाहेबांच्या विचारांतून मराठी माणसाला कायम स्फूर्ती मिळत राहते. स्मृतिदिनाच्या निमित्ताने लाखो शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर दाखल होतात. सालाबादाप्रमाणे यंदाही शिवतीर्थावर स्मृतिदिनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्मृतिस्थळाला भेट देऊन सहकुटुंब आदरांजली वाहणार आहेत. शिवसैनिकांसोबत अनेक राजकीय पक्षांचे नेतेही शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला भेट देणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांना ट्विटरवरून आदरांजली वाहिली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कायम आपल्याला मार्गदर्शन करीत राहतील. आमचे प्रेरणास्थान, मार्गदर्शक, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी शत शत नमन ! अशा आशयाचे ट्विट करत राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी बाळासाहेबांप्रती भावना व्यक्त केल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“उद्धव ठाकरेंचा पक्ष जसा नॅनो, तसा हा मोर्चा”, देवेंद्र फडणवीसांचा टोला

Aprna

राहुल गांधींनी मोदींना ‘जादू की झप्पी’ नव्हे, ‘झटका’ दिला | संजय राऊत 

News Desk

या नेत्यांना पंढरपुरची महापूजा करता आली नाही

swarit