HW News Marathi
राजकारण

युतीचा निर्णय जाहीर होण्यापूर्वी भाजप-शिवसेनेच्या स्वतंत्र बैठका सुरु

मुंबई | आगामी निवडणुकांच्या दृष्टीने देशातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. भाजप-शिवसेनेच्या युतीचा तिढा देखील आज (१८ फेब्रुवारी) सुटणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह भाजप-सेनेच्या युतीच्या चर्चेसाठी आणि अंतिम निर्णय जाहीर करण्यासाठी थोड्याच वेळापूर्वी मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. एकीकडे मुंबईतील सॉफीटल हॉटेलमध्ये अमित शाह यांची भाजप नेत्यांसह चर्चा सुरु आहे तर दुसरीकडे ‘मातोश्री’वर देखील उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेच्या नेत्यांची बैठक सुरु झाली आहे.

अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर थोड्याच वेळात म्हणजेच संध्याकाळी ६.३० वाजता संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी युतीबाबतचा अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“विधान परिषदेत मविआची विकेट पडेल; भाजपची नाही”, चंद्रकांत पाटलांचा दावा

Aprna

जर ५६ इंचाची छाती आहे तर कुलभूषण जाधवला सोडून का आणत नाही ?

News Desk

शरद पवारांची मानसिकता राजेशाही, आम्ही मात्र जनतेचे सेवक !

News Desk