HW News Marathi
राजकारण

एअर स्ट्राईकचे पुरावे मागितल्याने दिग्विजय सिंह यांच्यावर मोठी टीका

नवी दिल्ली | “ज्या प्रकारे अमेरिकेने ओसामा बिन लादेनचा खात्मा केल्यानंतर त्या कारवाईचे सबळ पुरावे संपूर्ण जगापुढे ठेवले होते. त्याचप्रमाणे आपणही आपल्या भारतीय वायू दलाने दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईबाबत करायला हवे”, असे विधान राज्यसभेचे खासदार आणि काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केले आहे. दिग्विजय सिंह यांच्या या विधानानंतर भाजपकडून त्यांच्यावर जोरदार टीका होण्यास सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिग्विजय सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे.

“दिग्विजय सिंह हे मोदींच्या विरोधाने आंधळे झाले आहेत. पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. हे देशासाठी लज्जास्पद आहे. ते मोदींचा विरोध करता करता आता भारतमातेचा विरोध करू लागले आहेत”, असे शिवराजसिंह चौहान यांनी म्हटले आहे. विरोधकांच्या या भूमिकेविरोधात मध्यप्रदेशात आज (३ मार्च) निदर्शने, धिक्कार सभा घेण्यात येत आहेत.

“आता इम्रान खान यांनी बहादुरी दाखवत हाफिज सईद, मसूद अजहरसारख्या दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात दिले पाहिजे”, असे दिग्विजय सिंह यांनी कमांडर अभिनंदन पाकिस्तानातून भारतात सुखरूप परतल्यानंतर इम्रान खान यांना सांगितले होते. त्याचप्रमाणे “भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशदवाद्यांच्या तळावर केलेल्या कारवाईबाबत मी प्रश्न उपस्थित करत नाही. मात्र, या भारतीय हवाई दलाच्या या कारवाईचे फोटो सॅटेलाईटच्या साहाय्याने मिळणे शक्य आहे. ज्याप्रकारे अमेरिकेने लादेनचा खात्मा केल्यानंतर त्या कारवाईचे सबळ पुरावे संपूर्ण जगापुढे ठेवले होते. त्याचप्रमाणे भारताने देखील करायला हवे”, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या राफेल कराराबाबत महत्वाचे खुलासे

News Desk

Bhima Koregaon : जाणून घ्या…भीमा-कोरेगावचे महत्त्व लोकांना कधी कळले ?

News Desk

२००० रुपयांची निवडणुकांमध्ये वाटायला आणली का ?

News Desk