Site icon HW News Marathi

नितीश कुमार यांनी आज घेतली शरद पवार यांची भेट

नवी दिल्ली | बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची आज भेट घेतली आहे. नितीश कुमार हे सध्या चार दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्ली दौऱ्यादरम्यान नितीश कुमार यांनी आज (7 ऑगस्ट) शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या दोघांची भेट ही 2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची मानली जाते.

नितीश कुमार यांच्या भेटीवर शरद पवार म्हणाले, “भाजप हे संपूर्ण देशात कब्जा करण्याचा प्रयत्न करत असून विरोधकांची एकजुट होणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी प्रयत्न सुरू असून देशहितासाठी सर्वांनीच एकत्र येणे गरजेचे आहे.” यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली होती.

दरम्यान, नितीश कुमार यांनी मंगळवारी (6 सप्टेंबर) गुडगावमधील मेदांता रुग्णालयात समाजवादी पक्षाचे माजी अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांची भेट घेतली होती. मुलायम सिंह यादव यांना भेटण्यापूर्वी त्यांनी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचीही भेट घेतली.

 

 

 

Exit mobile version