HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा २०१९

तुम्ही लोकसभेपूर्वी निर्णय घेतला असता तर सुप्रिया सुळेंनाही घरी पाठवले असते !

मुंबई | काँग्रेसचे नेते आणि इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी आज (११ सप्टेंबर) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित मुंबईतील गरवारे क्लब येथे दुपारी ३ च्या सुमारास हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश झाला आहे. दरम्यान, अनेक दिवसांपासून हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु होती. गेल्याच आठवड्यात हर्षवर्धन पाटील यांनी ४ सप्टेंबर रोजी कार्यकर्ता संकल्प मेळाव्याचे आयोजन केले होते. “आता अन्याय सहन करणार नाही”, असे म्हणत त्यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या भाजप प्रवेशाचे संकेत दिले होते. आता अखेर हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर चंद्रकांत पाटील यांनी काय म्हणाले ? जाणून घेऊया

नेमके काय म्हणाले चंद्रकांत पाटील ?
  • अनेक वर्षे लोकांमध्ये निवडून येऊन हर्षवर्धन पाटील यांनी एक ठसा उमटवला आहे
  • ज्याचं कोणाशीही राजकीय भांडण नाही असं व्यक्तिमत्व म्हणजेच हर्षवर्धन पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत
  • हर्षवर्धन पाटील यांनी लोकसभेच्या २ दिवसपूर्वी हा निर्णय घेतला असता तर आम्ही सुप्रिया सुळेंनाही घरी पाठवले असते.
  • येत्या दोन ते तीन दिवसांत आचारसंहिता लागेल.१५ ते २० ऑक्टोबरपर्यंत विधानसभाच्या निवडणुका होतील.
  • भाजप हा खूप मोठा पक्ष आहे. जुन्या लोकांवर अन्याय होणार नाही, पण नवीन लोक आल्याशिवाय पक्ष कसा वाढेल ?

Related posts

राज्याच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची कविता

News Desk

”जिथे विषय गंबीर तिथे मनसे खंबीर” मनसे देणार पद्मावतला पाठिंबा

News Desk

पंकजा मुंडेंना सर्वानुमते मुख्यमंत्रीपद बहाल केले पाहिजे |उद्धव ठाकरे

News Desk