HW News Marathi
राजकारण

भाजप हा मोदीकेंद्री किंवा शहाकेंद्री पक्ष नाही !

मुंबई | “भाजप हा कायम तत्त्वांच्या आधारावर चालत आलेला पक्ष आहे. हा कधीही व्यक्तीकेंद्री पक्ष नव्हता. आमचा पक्ष हा जर मोदीकेंद्री किंवा शहाकेंद्री झाला आहे अशी टीका होत असेल तर ते चुकीचे ठरेल”, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. “आमच्यासाठी राष्ट्रवाद हा निव्वळ निवडणुकीचा आणि प्रचाराचा मुद्दा नाही, तर तो आमचा आत्मा आहे”, असेही गडकरी यावेळी म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरी बोलत होते.

“आमचा पक्ष हा कधीही व्यक्तिकेंद्री नव्हता. ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वातही आमचा पक्ष व्यक्तिकेंद्री नव्हता आणि आता देखील नाही. भाजप आणि नरेंद्र मोदी हे एकमेकांना पूरक आहेत असे आपण म्हणू शकतो. परंतु, आमचा पक्ष मोदीकेंद्री किंवा शहाकेंद्री मुळीच नाही”, असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळी जाऊन घेणार आशीर्वाद

Aprna

पुण्यात शिवसैनिकांचा रास्ता रोको, इंधन दरवाढीचा निषेध 

News Desk

अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी ‘मविआ’ आक्रमक; विधानभवनाच्या पायर्‍यांवर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

Aprna