Site icon HW News Marathi

चित्रा वाघांचा उर्फी जावेदला इशारा, तर रुपाली चाकणकर खडेबोल; जाणून घ्या काय म्हणाल्या…

मुंबई | “छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रमध्ये आम्ही असा नंगानाच चालू देणार नाही”, असा इशारा भाजप नेत्या चित्र वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फी जावेदला (Uorfi Javed) दिला आहे. या पार्श्वभूमीवर चित्र वाघ यांनी आज (5 जानेवारी) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला.

चित्र वाघ म्हणाल्या, “म्हणून ही कोण उर्फी आहे. आणि तिचा काय नंगानाच आहे. हे मी त्या दिवशी बघितले, आणि त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रमध्ये आम्ही असा नंगानाच चालू देणार नाही, असा इशारा चित्र वाघ यांनी उर्फी जावेदला दिला आहे. चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, “ही भूमिका घेऊन, आम्ही त्या ठिकाणी काम करतोय, यात बऱ्याच उड्या बडल्या, आणि त्या बडायच्याच होत्या. यासगळ्या अपेक्षित उड्या होत्या, इथे विषय धर्माचा नाही. इथे विषय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रामध्ये जिथे महिलांचा मान सन्मान केला जातो. त्या ठिकाणी, सर्वजनिक ठिकाणी हा जो नंगानाच चालू आहे ना. या विकृतीला आहे, विरोध त्या उर्फीला नाही, त्या महिलेला नाही. तिच्या नंगानाचच्या विकृतीला आहे. आणि हा आमचा विरोध चालूच असणार आहे. आम्ही त्याला पूर्णत्वाला नेहणार आहोत”, असा त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

महिला आयोग पदावर बसणाऱ्यांचे उर्फीला समर्थन

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना उर्फी जावेद संदर्भात बोलताना चित्र वाघ म्हणाल्या, “या प्रकरणामध्ये अधिकार पदावर बसलेल्या ज्या महिला आहेत. त्या काय म्हणतात हे मला तुम्हाला सांगायचे आहे, कोणी काय कपडे परिधान करायचे आहे. हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. एखादा पेहराव ठराविक लोकांना अश्लील वाटत असेल, तो इतरांना अश्लील  वाटत नसतो. आणि त्यामुळे महिला आयोग अशा बाबतीत वेळ वाया घालवू शकत नाही, असे कोणी म्हटले, महिला आयोगाने म्हटले आहे. कुठल्या महाराष्ट्र राज्याच्या, आता महिला आयोगाचे काम काय आहे?”, असा सवाल चित्र वाघ यांनी केला आहे. चित्र वाघ पुढे म्हणाल्या, “महिला आयोगाचे काम आहे, मलिकांचा सन्मान जपणे, त्यांचा मान राखणे, हे महिला आयोगाचे काम आहे.”

 

 

 

 

 

Exit mobile version