Site icon HW News Marathi

शेवटच्या क्षणी देवेंद्र फडणवीसांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

मुंबई | एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. शिंदे-फडणवीसांनी आज (30 जून) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला. यानंतर दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी शिंदेंना भाजपचे समर्थन देणार आहे तर मी राज्याच सरकारमध्ये भान नसणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. फडणवीसांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळावा, अशी इच्छा केंद्राची असल्याचे त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखती म्हटले.

अगदी शेवटच्या क्षणी फडणवीस हे उपमुख्यमंत्री पदी विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील ट्वीट म्हणाले, “भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सांगण्यावरून देवेंद्र फडणवीसांनी मोठे मन दाखवून महाराष्ट्र राज्य आणि जनतेच्या हितासाठी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांच्या महाराष्ट्रासाठी असलेल्या खऱ्या निष्ठेचे आणि सेवेचे द्योतक आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.” शहांच्या ट्वीटनंतर फडणवीसांनी ट्वीट म्हणाले,” एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी पालन करतो. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे,” असे ट्वीटमध्ये म्हणाले.

जे. पी. नड्डा नेमके काय म्हणाले

नड्डा म्हणाले, “महाराष्ट्राच्या जनतेचे भले, विकास आणि लोकांच्या आकांक्षापूर्ण व्हाव्यात. या सर्व गोष्टी लक्ष्यात घेऊन आमच्या देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला आहे. परंतु, भाजपच्या केंद्रीय टीमने ठरविले आहे की, देवेंद्रजींनी सरकारमध्ये येईला पाहिजे. आणि नव्या सरकारमध्ये पदभार संभाळला पाहिजे. यासाठी देवेंद्र फडणवीस यांना केंद्राकडून मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि केंद्राने गोष्टी निर्देश दिले आहे की देवेंद्रजींनी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळावा. महाराष्ट्राच्या जनतेने आणि आकांक्षा आहे.”

संबंधित बातम्या
“देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व्हावे,” जे. पी. नड्डा यांचे मोठे विधान

 

Exit mobile version