Site icon HW News Marathi

माफीय संजय राऊतला आता हिशोब द्यावा लागणार! – किरीट सोमय्या

मुंबई | “माफीय संजय राऊतला आता हिशोब द्यावा लागणार,” अशी टीका भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)Sanjay Raut यांच्यावर ईडीची (ED) कारवाई सुरू आहे. राऊतांच्या भांडूप येथील मैत्री निवासस्थानी आज (31 जुलै) ईडीचे दाखल झाले. राऊतांच्या कारवाईवरून किरीट मोमय्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांच्यावर निशाणा साधला.

सोमय्या म्हटले “ईडीच्या कारवाईचे मी स्वागत करत आहे. संजय राऊतांना हिशोब तर त्यावाच लागणार आहे. 1200 कोटीचा पत्राचाळ घोटाळा असो किंवा वसई नायगावमधील बिल्डरचा घोटाळा असो, माफीयागिरी असो, दादागिरी असो, प्रत्येकाला जेलमध्ये पाठवायची धमकी महाविकास आघाडीचा जो महाराष्ट्र लुटण्याचा प्रकल्प सुरू होता. आता हिशोब तर द्यावाच लागणार, आज महाराष्ट्राची जनताला अत्यंत आनंद होत आहे. माफीय संजय राऊतला पण हिशोब द्यावा लागणार.”

दरम्यान, राऊतांवर ईडीची कारवाई सुरू असताना ट्वीट करत प्रतिक्रिया दिली. राऊत म्हणाले, “ही खोटी कारवाई आहे. या प्रकरणातील पुरावे देखील खोटे आहेत. मी शिवसेना सोडणार नाही आणि मरेन पण शरण जाणार नाही.” राऊतांनी अजून ट्वीट करत म्हणाले, “कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे.. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय.. मी शिवसेनेसाठी लढत राहीन.”

 

 

संबंधित बातम्या

“बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय…,” ED च्या कारवाईवर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

संजय राऊत यांच्या निवासस्थानी ED चे पथक दाखल; ‘या’ प्रकरणी अटक होणार?

Exit mobile version