Site icon HW News Marathi

“…लवकरच कळेल किती साखर खाल्ली”, मोहित कंबोजांनी ट्वीट करत रोहित पवारांवर साधला निशाणा

मुंबई | भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी पाच ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेस रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. कंबोज यांनी ‘गबरू जवान’ म्हणत त्यांनी नाव न घेता रोहित पवारवर टीका केली आहे.  ग्रीन एकर्स रिसॉर्ट्स अँड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा 200 वेगवेगळे स्टार्ट अप्सवरून रोहित पवारवर ट्वीट करत भ्रष्टाचार केल्याचा आरोप कंबोज यांनी आज (28 ऑगस्ट)  केला आहे.

पहिल्या ट्वीटमध्ये मोहीत कंबोज म्हणाले, “सर्व घोटाळे त्यांनीच केले आणि आता ते उघड झाल्यावर भाजपला कोंडीत पकडणे हाही नवा धंदा. आपण काहीही चुकीचे केले नसताना आपल्याला कशाची भीती वाटते? खरा माणूस कधीही तपासाला घाबरत नाही, ज्याच्या मनात चोर असतो तोच घाबरतो. ज्यांचे घर काचेचे आहे, ते इतरांच्या घरावर दगडफेक करत नाहीत. 2006 मध्ये भाजप नेत्यांनी रोहित पवार यांना #PMCBank #HDIL घोटाळा राकेश वाधवन सह भागीदार होण्यास भाग पाडले, 2006 ते 2012 या काळात स्टार्ट अप कंपनी ग्रीन एकर रिसॉर्ट्स अँड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड  कोटींचे व्यवहार केले. सब गलती भाजपा की है जी”, असे देखील मोहीत कंबोज ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

तर दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले, “राष्ट्रवादीचे बोल बच्चन , मियाँ नवाब मलिक (सलीम) आणि सेनेत संजय राऊत (जावेद) होते. पक्षात दोन्ही जागा भरण्यासाठी स्पर्धा सुरू असल्याचे दिसत आहे. चालत राहा पण नवाब आणि मार्ग बनू नका,” असा सल्ला त्यांनी दिला. तिसऱ्या ट्वीटमध्ये कंबोज म्हणाले, “त्याच साखर कारखान्याने पुन्हा दीडशे कोटींचे कर्ज घेतले. HDIL – PMC Bank – Patra Wala Chawl या गबरू जवानला लवकरच कळेल किती साखर खाल्ली आहे. अप्रतिम बिझनेस मॉडेल भाऊ या गबरू जवानचा सर्व दोष भाजपचा आहे,” या ट्वीटमध्ये रोहित पवारचा उल्लेख गबरू जवान असा उल्लेख केला आहे.

दरम्यान, चौथ्या कंबोज यांनी ट्वीटमध्ये म्हणाले, “गबरू जवानचे व्यवसाय मॉडेल:- महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे 2007 ते 2012 पर्यंत 1000 कोटींचे नुकसान झाले. या बँकेने साखर कारखान्याला कोट्यवधींचे कर्ज दिले. साखर कारखान्याने पैसे दाबले, त्यानंतर 2012 मध्ये साखर कारखान्याचा लिलाव झाला आणि गब्रू जवानच्या बारामती अॅग्रोने कार्टेल बनवून केवळ 50 कोटींना विकत घेतले.” पाचव्या ट्वीटमध्ये कंबोज यांनी रोहित पवार यांचे नाव वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद घेण्याची मागणी केली आहे. “भारताच्या #JeffBezos ला भेटा – 2006 मध्ये, या 21 वर्षीय गबरू जवानने ग्रीन एकर्स रिसॉर्ट्स अंतर्गत 200 विविध प्रकारचे प्लास्टिक, हिरे, सोने, बिल्डर, निर्यात, आयात, मद्य ते ट्रंकचा व्यवसाय सुरू केला. गिनीज बुकची विनंती केली. वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याचे नाव कोरले.”

 

 

 

 

Exit mobile version