Site icon HW News Marathi

“राष्ट्रवादीचा एक मोठा नेता लवकरच देशमुख आणि मलिकांना भेटणार”, कंबोज यांचे खळबजनक ट्वीट

मुंबई | “राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा नेता लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना भेटणार आहे”, असे ट्वीट भाजप नेता मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी केले आहे. कंबोज यांच्या ट्वीटमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. कंबोज यांनी ट्वटी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांकडे इशारा केला. याबद्दल आता राजात अनेक नावावर चर्चा होत आहे.

कंबोज यांनी तीन ट्वीट केले आहे. यात पहिल्या ट्वीटमध्ये कंबोज म्हटले, “हर हर महादेव ! अब तांडव होगा !” असे लिहिले. यानंतर दुसरे ट्वीट केले यात कंबोज म्हणाले, “1. अनिल देशमुख 2. नवाब मलिक 3. संजय पांडे 4. संजय राऊत 5_______माझे 100 टक्के खरे असते.” कंबोज यांनी तिसरे ट्वीटमध्ये म्हटले, “हे ट्विट सेव्ह करा: राष्ट्रवादीचा एक मोठा नेता नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची लवकरच भेट घेणार!,” असे ट्वीट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक या दोघांना सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहेत.

 

 

Exit mobile version