Site icon HW News Marathi

“छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करायची नसेल तर…”, उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई | “छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करायची नसेल तर त्यांचे नाव घेण्याचा कुणालाही अधिकार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी राज्यापाल आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्तेंनी महाराजांवर केलेल्या अपमानावर केली आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी या दोघांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्य केली. यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात दोघांबद्दल संताप व्यक्त होत आहे. राज्यापालांविरोधात राज्यभरात विरोध प्रदर्शन आणि आंदोलन सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी आज (28 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान उदयनराजेंच्या डोळ्यात अश्रू आले.

उदयनराजे भोसले म्हणाले, “राज्यपाल महोदयांच्या अनावश्यक अनाकलयीन, निंदनीय वक्तव्याची पंतप्रधान महोदयांनी गांभीऱ्याने दखल घ्यावी, अशी भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेतून मांडली. पुढे उदयनराजे भोसले म्हणाले, शिवजी महाराज यांच्याबाबत कोणी वेडे वाकडे बोलत असेल आणि राजकीय नेते शांत बसत असतील. शिवाय अशा लोकांवर कारवाई करत नसतील तर महाराजांचे नाव घेण्याचा कोणालाही अधिकार नाही, अशी भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेतून मांडली.

“छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होत असल्याचे पाहून मनाला खूप वेदना होत आहेत. महाराजांचा अपमान होत असेल तर कोणाच्याही डोळ्यात अश्रु येणार. इथे आलेल्या प्रत्येकाची हीच भावना असून मी हतबल आहे, असे समजा?, राज्यपालांवर कारवाई होईल, अशी अपेक्षा आहे”, असे म्हणत उदयनराजे भोसले यांच्या डोळ्यात अश्रू आले. पुढे ते म्हणाले, “शिवाजी महाराजांची प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई होत नसेल तर विमानतळांना महाराजांची नावे का द्यावीत? आणि महाराजांची जयंती तरी का साजरा करता?,” असा सवाल करत त्यांनी उपस्थित केला आहे.

 

 

 

Exit mobile version