HW News Marathi
राजकारण

अंतिम प्रचारसभेत मंचावर पंकजा मुंडे यांना भोवळ

परळी | आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपलेली असताना शनिवारी (१९ ऑक्टोबर) संध्याकाळी राज्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर, महिलाविकास व बालकल्याण आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना शनिवारी (१९ ऑक्टोबर) बीड जिल्ह्यात आपली अंतिम प्रचारसभा घेतली. यावेळी भाषण करून झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना व्यासपीठावरच भोवळ आली. त्यानंतर, पंकजा मुंडे यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी चिंता करण्याचे कारण नसून पंकजा मुंडे यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती दिली.

राज्यात यांच्या विधानसभेकरिता ज्या काही अत्यंत महत्त्वाच्या लढती मानल्या जातात त्यांपैकी एक महत्त्वाची लढत आहे परळी मतदारसंघातील. राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे विरुद्ध भाजप उमेदवार पंकजा मुंडे अशी भाव-बहिणीची लढत या मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकमेकांवर सडकून टीका केली. यावेळी भाषण करताना पंकजा मुंडे प्रचंड भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. परळीतील आपल्या मतदारांना यावेळी त्यांनी भावनिक साद देखील घातली. मात्र, यावेळी पंकजा मुंडे यांनी आपले भाषण संपविले आणि त्यांना मंचावरच भोवळ आली. या सभेला पंकजा मुंडे यांचे पती अमित पालवे देखील उपस्थित होते. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील उमेदवारांची अर्ज भरण्याची लगबग आजपासून सुरू

News Desk

दंगली व दहशतवादी हल्ले हे निवडणुका जिंकण्याचे साधन ठरू नये !

News Desk

“माझा जुना अर्थवट व्हिडिओ दाखवून दिशाभूल करण्याचं काम”, मुनगंटीवारांचं स्पष्टीकरण

News Desk