HW News Marathi
राजकारण

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात !

मुंबई | “आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात बाबा…हागणारा नाही तर बघणारा लाजातो,” असे वादग्रस्त ट्विट करत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी केले आहे. वाघ यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा उल्लेख करत हे विधान केले आहे. लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपली असताना वाघ यांच्या विधानाने सर्व स्तरातून टीका होत आहे.

वाघ यांनी मराठा क्रांती वॉरियर या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेल्या एका ट्विटला उत्तर देताना वाघ यांनी सर्व मर्यादा सोडल्या. मराठा क्रांती वॉरियर यांनी “शेतकरी पुत्र आणि सर्वसामान्यांचा आवाज असणाऱ्या असलेल्या पत्रकारांना ट्रोल करू नका, असा इशारा मराठा क्रांती वॉरियरकडून देण्यात आला होता.” हे ट्विट केले होते. या ट्विटला उत्तर देताना वाघ यांनी “आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात बाबा…हागणारा नाही तर बघणारा लाजातो,” असे वादग्रस्त ट्विट केले होते.

 

वाघा यांनी यापूर्वी देखील असेच ट्विट करून नेहमीच चर्चा विषय ठरतात. पंतप्रधान मोदी हे विष्णूंचे अकरावे अवतार असल्याचे ट्विट वाघ यांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये केले होते. त्यावेळीही त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. भाजपाच्या अनेक नेत्यांनी अशी वादग्रस्त विधानं केली आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी मतं विकत घेण्याचा प्रयत्न केला, काँग्रेसचा आरोप

News Desk

काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

News Desk

मोदी ज्यांना वाचविण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या खिशातून आम्ही न्याय योजनेसाठी पैसे आणणार !

News Desk