HW News Marathi
राजकारण

साध्वी प्रज्ञाच्या रोड शोदरम्यान गोंधळ, एनसीपी कार्यकर्त्यांनी दाखविले ‘काळे झेंडे’

भोपाळ | मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आज (२३ एप्रिल) रोड शोदरम्यान गोंधळ उडाला. साध्वी प्रज्ञासिंह यांनी जुन्या भोपाळमधील भवानी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रोड शो काढला. या रोड शोदरम्यान एनसीपीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

यावेळी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविणाऱ्या एनसीपीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आहे. या गोंधळानंतर पोलिसांनी एनसीपीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सरु आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी मिळाल्यापासून वादाच्या भोवड्यात अडकल्या आहेत. मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी भोपाळ लोकसभा मतदार संघातील भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर टीका होत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मायावती विरोधी पक्षांच्या बैठकीत सहभागी होणार नाहीत, बसपचा खुलासा

News Desk

मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची बैठक संपली; बंडखोराबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता

Aprna

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर पहिल्या ट्वीटमध्ये बाळासाहेबांची आठवण करत म्हणाले…!

Aprna