HW News Marathi
राजकारण

राहुल गांधींच्या रोड शोमध्ये ‘ब्लास्ट’

जबलपूर । राहुल गांधी शनिवारी जबलपूरमध्ये रोड शोच्या दरम्यान गॅसच्या फुग्याचा स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. आग मोठ्या प्रमाणात न भडकल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. राहुल गांधीसह अनेक लोक सुखरुप आहेत. राहुल यांनी जबलपूरमध्ये ८ किमीचा रोड शो केला. शास्त्री ब्रिज गॅस फुग्यांनी सजवला होता.

राहुल गांधींच्या आरतीसाठी ताट तयार करण्यात आले होते. या आरतीचं ताट गॅस फूगांच्या संपर्कात आल्यामुळे स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. या घटनेच्या राहुल काही फूटच्या अंतरावर होते. घटनेनंतर गाडीमध्ये असलेले सर्व लोक काही वेळा पुरते स्तबद्ध झाले होते. पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. जमावाला थोड्या वेळासाठी बाजूला करण्यात आले.

निवडणूक आयोगाने शनिवारी (६ ऑक्टोबर)ला मिझोराम, छत्तीसगढ, तेलंगणा,मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांच्या विधान सभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेश व मिझोराममध्ये २८ नोव्हेंबरला मतदान घेण्यात येणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी मोर्चे बांधणी करण्यासाठी मध्य प्रदेशातमध्ये रोड शोने प्रचाराचा नारळ फोडला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पडत्या काळात संजय राऊत नेहमीच पाठीशी उभे राहतात !

News Desk

पूनम महाजन विलफुल डिफॉल्टर, सचिन सावंत यांचा गंभीर आरोप

News Desk

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ‘हा’ निर्णय घेतल्यामुळे गोपीचंद पडळकरांनी मानले आभार

Aprna