HW News Marathi
राजकारण

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू, राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांचा बहिष्कार

मुंबई | विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनालाआज (२५ फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक विधानसभेच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलनाला बसले आहेत. तसेच राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव विधानभवनात पोहोचताच विरोधीपक्षांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्यापालांच्या विरोधात प्रसार माध्यमांना बोलताना म्हणाले की, “राज्यपाल हे पद घटनात्मक असतांना त्यांनी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे अशी भूमिका घेतली आहे.आजचे त्यांचे अभिभाषण हे राज्यपाल म्हणून राज्याच्या हिताचे असेल की संघाचा कार्यकर्ता म्हणून संघाचा अजेंडा राबवणारे ? याबाबत शंका आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

‘गांधी हम शर्मिंदा है, तेरे कातील जिंदा है’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. राज्यपाल येताच विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. महात्मा गांधींच्या प्रतिमेळा गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. तेव्हा राज्यपालांनी आरएसएसचे समर्थन केले होते. असं सांगत विरोधीपक्षांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला आहे.

हे अर्थसंकल्पीय अधिवेशन केवळ सात दिवसाच असणार आहे. त्यामुळे अधिवेशनात प्रश्नोत्तरे आणि लक्षवेधीला चर्चा करता येणार नाही. लोकसभा निवडणुक तोंडावर असताना सर्व पक्षांनी विविध मुद्यांवरून विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. रविवारी (२४ फेब्रुवारी) अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावरसुद्धा विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला होता.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकांनी विश्वास दाखवला आहे, कामातून गतिमान प्रशासनाचा संदेश पोहचवूया! – मुख्यमंत्री

Aprna

महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिवपदी ट्रान्सजेंडर व्यक्तीची निवड

Arati More

शरद पवार यांची प्रचाराची भाषा खालच्या पातळीची !

News Desk