Site icon HW News Marathi

“रायगडमध्ये होणारा बल्क ड्रग पार्कचा प्रकल्पही महाराष्ट्रातून बाहेर”, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर आरोप

मुंबई | “रायगडमध्ये होणारा बल्क ड्रग पार्कचा  (Bulk Drug Park Project) प्रकल्पही महाराष्ट्रातून बाहेर गेला आहे”, असा आरोप शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला आहे. राज्यातील वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) प्रकल्पाच्या मुद्द्यावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर विरोधक शिंदे सरकारवर धारेवर धरत आहेत. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आज (14 सप्टेंबर) पत्रकार परिषद देऊन शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

 

आदित्य ठाकरे म्हणाले, “बल्क ड्रग पार्क देखील आमच्या रायगडमध्ये आणि इतर काही परिसरामध्ये आणणार होतो. आता बल्क ड्रग पार्कमध्ये हिमाचल प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेश आहे. आणि पहिला गुजरातमधील भरूचमध्ये हा बल्क ड्रग पार्क येणार आहे. बल्क ड्रग पार्काची मागणी महाराष्ट्राने पहिली केली होती. परत एकदा सांगतो की, ही बातमी ही 2 ते 3 सप्टेंबरची आहे. म्हणजे आताच्या अवस्थेचे स्वत:ला मुख्यमंत्री म्हणून घोषित करणारे मुख्यमंत्री महोदय गणेशोत्सवात गरा गरा मंडळांना भेटी देत होते. अनेक ठिकाणी फिरत होते. परंतु, कदाचित आता उद्योग मंत्र्यांना देखील हा विषय माहिती नसेल. किंवा मुख्यमंत्री महोदयांना देखील हा विषय माहिती नसेल. ल्क ड्रग पार्क हा जो मोठा प्रकल्प होता. महाराष्ट्रासाठी उपयोगी होता. यावर महाराष्ट्राचा पहिला हक्क होता. तो आपल्या राज्यातून निघून गेलेला आहे.

 

महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली – सुभाष देसाई

राज्याचे माजी मंत्री सुभाष देसाई यांनी देखील शिंदे सरकारवर बल्क ड्रग पार्क प्रकल्पावरून टीका केली. यावेळी सुभाष देसाई म्हणाले, “बल्क ड्रग पार्क यांच्याबद्दलची सगळी माहिती केंद्र सरकारने आपल्याकडून मागून घेतली. आणि महाराष्ट्राची सगळी स्थिती बरोबर आहे, अशा प्रकारचे केंद्राकडून उत्तर आलेले असताना आता तोही प्रकल्प गुजरातकडे गेलेला आहे. आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि गुजरात यातूनही महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसलेले आहे. आता मला भीत अशी वाटते की, पुढच्या काळामध्ये असेच प्रकल्प जात राहिले. हे जे सरकार आहे. निभळे सरकार आहे. खाली मान घालून सगळे सहन करत राहील. या सरकारची तिथे बोलण्याची हिम्मत देखील होणार नाही.”

 

 

Exit mobile version