Site icon HW News Marathi

पुण्यातील चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजप 40 स्टार प्रचाराकांची यादी जाहीर

मुंबई | पुण्यातील चिंचवड (Chinchwad Assembly by-election) आणि कसबा (Kasba Assembly by-election) विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीत भाजपने (BJP) 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात स्टार प्रचारकात केंद्रीय, राज्य मंत्र्यांसह स्थानिक नेत्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघात 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या दोन्ही जागांवर भाजपने बिनविरोध होण्यासाठी आवाहन केले होते. परंतु, महाविकास आघाडीने पोटनिवडणूक बिनविरोध न करता लढविण्यासाठी रिंगणात उतरले आहे.

दरम्यान, चिंचवड आणि कसबा मतदारसंघ काबीज करण्यासाठी भाजपने कंबर कसली असून या पार्श्वभूमीवर भाजपने 40 स्टार प्रचारांची यादी जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंग यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना भाजपच्या 40 स्टार प्रचारकांची यादी पाठवली आहे.

अशी आहे भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे-पाटील, भागवत कराड, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेचे सभापती प्रवीण दरेकर, खासदार उदयनराजे भोसले, गिरीश बापट, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष शेलार, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, आमदार विनोद तावडे, श्रीकांत भारतीय, रवींद्र चव्हाण, सुनील कर्जतकर, खासदार धनंजय महाडीक,

 

 

 

Exit mobile version