Site icon HW News Marathi

“उद्धव ठाकरेंना कंटाळून शिवसेनेतून 40 आमदार बाहेर पडले”, गिरीश महाजनांचा दावा

मुंबई | “उद्धव ठाकरे कंटाळून शिवसेनेतून 40 आमदार बाहेर पडले”, असा दावा कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला आहे.  गिरीश महाजनांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळा चर्चेला उधाण आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) शिवसेनेतून बाहेर पडतानाचा तो किस्सा गिरीश महाजानांनी जळगावमधील एका सभेत सांगितला. “शिंदेंसोबत 40 लोके जमा करणे सोपे नव्हते. पण, ते सर्व जण शिंदेच्या पाठिशी उभे राहिले”, असा ही गिरीश महाजनांनी सांगितले.

 

गिरीश महाजन म्हणाले, “एकनाथ शिंदे कसे मुख्यमंत्री झाले. या गोष्टींचा कोणी विचार केला तर आम्हाला विश्वास बसत नव्हता. परंतु,  ऑपरेशनला तर सुरुवात केली होती. परंतु, आमचा विश्वास बसत नव्हता. एकनाथ राव निघाले, पुढे गेले बघता बघता सर्व सैन्य त्यांच्या मागे गेले. ऐवढे सोपे आहे का?, शिवसेनेसारख्या पक्षातून लोक बाहेर पडत आहेत. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारला (महाविकास आघाडी) कंटाळून बाहेर पडत आहेत. सोपे नव्हते, यातून लोके आले. शिंदे साहेबांच्या पाठिशी उभे राहिले. आणि म्हणून अनेक लोकांचे आशीर्वाद आणि अनेक लोकांच्या दुआ त्यांच्या पाठिशी आहे.

 

एकनाथ शिंदेंनी असा केला बंड

 

विधानपरिषदे निवडणुकीचा 20 जून 2022 रोजी निकाल हाती आले. महाविकास आघाडीचा एक उमेदवाराचा परावभ झाला होता.  या पार्श्वभूमीवर तात्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलविली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह 15 ते 18 आमदार नॉट रिजेबल आली. हा संपूर्ण मध्य रात्री घटला होता, यानंतर 21 जून 2022 मध्ये प्रसार माध्यमांमध्ये शिवसेनेतील नाराज नेत्यांनी बंड पुकारल्याच्या बातम्या बाहेर आल्या. हे सर्व नाराज मंडळी गुजरात्या सुरतमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होते. या बंडखोर नेत्यांना मनधरणी करण्यासाठी शिवसेनेचे सचिव मलिंद नार्वेकरांना पाठविण्यात आले होते. परंतु, नाराज शिवसैनिकांची मनधरणी करण्यास असफल झाले. यानंतर हे बंडखोर आमदार गुजरातनंतर गुवाहाटीमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. यादरम्यान आमदारांची संख्या 35 कडे आली होती. या बंडाला तीन दिवस झाल्यानंतर बंडखोर आमदारांची संख्या 40 झाली. ही घटना राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच घडली होती. यानंतर महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांनी 29 जून रोजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. अवघ्या अडीच वर्षात महाविकास आघाडीचे सरकार कोसळले.

 

 

 

Exit mobile version