Site icon HW News Marathi

‘या’ विधानसभेच्या जागा गुजरातचे भविष्य बदलू शकतात?

मुंबई | गुजरात विधानसभा निवडणुकीचा (Gujarat Assembly Election ) कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. यापूर्वी सर्व राजकीय पक्षांनी गुजरात काबीज करण्यासाठी तयारीला लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देश चालवित असले तरी त्यांचे लक्ष गुजरातकडे कायम असते, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेला गुजरातवर वर्चस्व मिळवण्यासाठी आम आदमी पार्टी आणि काँग्रेस हो दोन्ही पक्ष प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, गेल्या दोन दशकाहून अधिककाळ गुजरातमध्ये भाजपचे वर्चस्व राहिले आहे. यामुळे यंदाची गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला असल्यामुळे ही निवडणूक जास्त महत्वाची आहे. याआधी 2017 मध्ये झालेली गुजरात निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये अडीतडीचा सामना झाल्याचे आपण पाहिले होते. कारण गुजरातमध्ये सत्तास्थापनेसाठी 182 जागा आहे. तर बहुमतासाठी 91 जागा असणे महत्वाचे आहे. यात भाजपला 99 जागांवर विजय मिळाला तर काँग्रेला 77 जागांवर विजय मिळाला होता. काँग्रेसला बहुमताचा आकडा पार करण्यासाठी 14 जागा कमी पडल्या होत्या. या बेरोजगारी, लॉकडाऊन, मोरबी झुलता पूल आदी मुद्यांवर गुजरातच्या निवडणुकीत काय फरक पडले, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

डेटा काय म्हणतो ते पाहूया…

2017 गुजरात विधानसभा निवडणुकीत 26 विधानसभा मतदारसंघ किंमेकर ठरल्या होत्या. या 26 विधानसभा मतदारसंघा 10 हजारपेक्षा कमी मतांच्या फरकाने भाजप जिंकल्या होत्या. या 26 विधानसभा मतदारसंघातील 14 जागा भाजपने जिंकल्या होत्या. तर काँग्रेस 10 जागा आणि 2 अपक्षांनी जागा जिंकल्या आहेत.

तसेच भाजपने 12 विधानसभा मंतदरसंघातील जागा 5 हजारपेक्षा कमी फरकाने जिंकल्या होत्या. यात काँग्रेसने 8 जागांवर विजय मिळविला तर 2 अपक्षांच्या पदरात पडल्या होत्या. त्याचबरोबर भाजप आणि काँग्रेस दोघांनी 1000 पेक्षा कमी मतांनी तीन जागा जिंकल्या होत्या. तर 2 जागा अपक्षांनी जिंकल्या. पंचमहाल जिल्ह्यातील गोध्रा मतदारसंघात किमान 258 जागांच्या फरकाने मतदान झाले. सीके राउलीजी हे भाजपचे उमेदवार होते आणि परमार राजेंद्रसिंह बलवंतसिंह हे काँग्रेसचे उमेदवार होते.

 

 

2017 मध्ये निवडणुकीत आम आदमी पक्षाला विरोधी पक्ष म्हणून वांकानेरमध्ये सर्वात जास्त मते मिळाली होती. आपच्या शेरसिया उस्मांगानी हुशेन यांना 3000 च्या जवळपास मते मिळाली. तर काँग्रेसने पुन्हा जिंकलेल्या त्या मतदारसंघातील विजयाचे अंतर 3000 पेक्षा कमी आहे.  दरम्यान, गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांचे पुत्र महेंद्रसिंह वाघेला यांनी शुक्रवारी अहमदाबादमध्ये पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

सी-व्होटरच्या सर्वेक्षणानुसार,  42.3 टक्के लोक भाजप सरकारच्या कामावर समाधानी आहेत. यात 32.2 टक्के लोकांनी ते गरीब असल्याचे मानले आणि 25.6 टक्के लोक सरासरी असल्याचे म्हटले.सी-व्होटरच्या सर्वेक्षणानुसार, गुजरातमधील 39.9 मतदारांनी सांगितले की, भाजप सरकारवर नाराज आहेत. परंतु, त्यांना शासन बदल नको आहे. आणि 33.9 टक्के लोकांनी सांगितले की ते रागावले आहेत आणि त्यांना राज्य सरकार बदलायचे आहे तर 26.2 टक्के लोकांनी भाजपच्या राजवटीवर खूश असल्याचे सांगितले.

Exit mobile version