HW Marathi
देश / विदेश राजकारण

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करणे हे असंवैधानिक !

नवी दिल्ली | मोदी सरकारच्या जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयावर काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरबाबत मोदी सरकारकडून घेण्यात आलेला निर्णय हा घटनाबाह्य असल्याची टीका यापूर्वी राहुल गांधी यांनी केली होती. त्यानंतर आता काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी देखील मोदी सरकारच्या या निर्णयावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करणे हे असंवैधानिक आहे”, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे. प्रियांका गांधी आज (१३ ऑगस्ट) सोनभद्र दौऱ्यावर होत्या.

“सरकारने कलम ३७० रद्द करण्याचा जो निर्णय घेतला आहे ते संविधानाचे उल्लंघन आहे. या निर्णयामुळे देशाच्या सुरक्षेला देखील बाधा पोहोचण्याची शक्यता आहे”, असेही प्रियांका गांधी म्हणाल्या.”पक्षाची मोदी सरकारच्या जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याबाबत घेतलेली भूमिकाच माझी देखील भूमिका आहे. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आणि गुलाम नबी आझाद संसदेत जे बोलले ते मला योग्य वाटते, पटते”, असेही प्रियंका गांधी यावेळी म्हणाल्या.


प्रियांका गांधी यांनी सोमवारी (१२ ऑगस्ट) बकरी ईदच्या दिवशी देखील एक ट्विट केले होते. “ईद मुबारक !, जम्मू-काश्मीरमधल्या माझ्या बहीण-भावांना सध्या मोठा त्रास सहन करावा लागत आहे. केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्र देखील पूरस्थितीचा सामना करत आहे. त्यामुळे तेथील लोकांना देखील ईद साजरी करता आली नसेल”, असे ट्विट प्रियांका गांधी यांनी केले होते.

Related posts

पेट्रोलचे दर ४८ रुपयांपेक्षा जास्त असणे म्हणजे जनतेचे शोषण | सुब्रमण्यम स्वामी

News Desk

मोदींच्या कार्यक्रमासाठी आधार सक्ती

News Desk

निवडणुकांसाठी मोदींचे हे खालच्या पातळीचे राजकारण | निरुपम

Gauri Tilekar