HW News Marathi
राजकारण

INX Media Case : माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम सीबीआयच्या ताब्यात

नवी दिल्ली । आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणी तब्बल हाय व्होल्टेज ड्राम्यच्या ३० तासानंतर सीबीआयने माजी केंद्रीय गृह तथा अर्थमंत्री ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना सीबीआयने रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास त्यांच्या जोरबाग येथील निवासस्थानात अटक केली. एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याला अटक करण्यात आल्याची मोठी आणि पहिलच घटना असून चिदंबरम यांच्या अटकेने काँग्रेस पक्षाला धक्का बसला असल्याचे बोलले जाते.

अटक होण्यापूर्वी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास चिदंबरम नवी दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. अवघ्या सहा मिनिटे चाललेल्या या पत्रकार परिषदेत चिदंबरम यांनी त्यांच्यावर लावल्याले सर्व आरोप फेटाळून लावले. पत्रकार परिषदेदरम्यान अपल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यासाठी सीबीआय अधिकारी पोहोचले होते. परंतु तोपर्यंत परिषद समाप्त करून चिदंबरम जोरबाग येथील निवासस्थानी निघून गेले होते. सीबीआय पथकही मागोमाग जोरबागेत दाखल झाले. चिदंबरम यांच्या निवासस्थानाजवळ काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. सीबीआय पथक येथे दाखल होताच घराचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून घेण्यात आले. त्यामुळे सीबीआय अधिकार्‍यांनी संरक्षक भिंतीवरून उड्या मारून घरात प्रवेश केला आणि मुख्य प्रवेशद्वार आतून उघडले. सीबीआयचे वाहनही कंपाऊंडमध्ये आत घेण्यात आले. मोजक्या अधिकार्‍यांनी घरातच चिदंबरम यांना ताब्यात घेतले.

सीबीआयच्या कारवाईच्या निषेधार्थ बाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले होते. बळाचा वापर करीत पोलिसांनी कार्यकर्त्यांना उचलून नेले. पी. चिदंबरम मंगळवार (२० ऑगस्ट) नॉट रिचेबल होते. ईडी आणि सीबीआय पथकाने मंगळवारी रात्री दोनवेळा चिदंबरम यांच्या जोरबाग येथील घरावर सीबीआय कार्यालयात हजर राहण्याबाबत नोटीस चिकटवली होती. मात्र, चिदंबरम कार्यालयात हजर झाले नाहीत. त्यामुळे ईडी आणि सीबीआयने संयुक्तपणे चिदंबरम यांना अटक करण्यासाठी शोधाशोध सुरू केली होती.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विश्वजित कदम यांनी फेटाळल्या भाजप प्रवेशाच्या चर्चा

News Desk

चंद्रशेखर आझाद यांची सुटका करा | अविनाश महातेकर

News Desk

राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकशाहीला धक्का देणारा! – अजित पवार

Aprna