Site icon HW News Marathi

बाळासाहेब ठाकरेंचे सर्वात विश्वासू सहाय्यक चंपासिंह थापा यांचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई | शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा विश्वासू सहाय्यक म्हणून ओळखला जाणारा चंपासिंह थापा (champa singh thapa) यांनी शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती आज (26 सप्टेंबर) चंपासिंह थापा यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू म्हणून थापांची ओळखले जातात. थापांचे शिंदे गटा प्रवेश करणे हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा भाविक धक्का मानला जातो.

नवरात्रीच्या निमित्ताने थापांनी ठाण्याच्या देवीचे दर्शन घेऊन शिंदे गटा प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी थापांना शाल आणि पुष्प गुच्छ देऊन त्यांचे शिंदे गटात स्वागत केले. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर थापांनी माध्यमाशी बोलताना म्हणाले, “मी पहिल्यापासून शिवसेनेची सेवा करत होतो”, आता शिंदेंची सेवा करणार असल्याचे त्यांनी म्हटले

गेल्या 30 वर्षापूर्वी मुंबईत आले असून थापा हे मुळ नेपाळ आहेत. मुंबई नोकरी निमित्ताने आल्यानंतर उदरनिर्वाहासाठी थापांनी छोटी-मोठी कामे करत होती. त्या काळात मुंबईच्या कबड्डीत के. टी. थापा यांचे नाव खूप मोठे होते. तर के. टी. थापा भांडुपचे नगरसेवर झाले. यानंतर चंपासिंह थापा हे के. टी थापांच्यासोबत मातोश्रीवर गेले आणि बाळासाहेबांचे खास विश्वास सेवक झाले. यानंतर थापांनी बाळासाहेबांच्या जेवणाच्या आणि औषधाच्या वेळा सांभाळल्या होत्या. तसेच बाळासाहेबांसोबत थापा हे प्रत्येक संभारंभात आणि दौऱ्यात त्यांच्यासोबत असायचे. बाळासाहेबांच्या निधनानंतर सुद्धा थापांनी मातोश्रीवर सेवा केली. परंतु, आज थापा हे शिंदे गटात सामील झाल्याने ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जातो.

 

 

 

Exit mobile version