Site icon HW News Marathi

“सूर्य, चंद्र, तारे असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श असणार”, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई | “जोपर्यंत सूर्य, चंद्र तारे असेपर्यंत महाराष्ट्र आणि देशाचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराजच असणार आहेत”, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या महाराजांवर केलेल्या वक्तव्यावर केले आहे.  राज्यपालांच्या विधानाचा वेगळा अर्थ काढला गेला, असे म्हणत फडणवीसांना त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.  राज्यपालांनी मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात बोलताना वादग्रस्त विधान केले आहे.

 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा दुसरा कुठला आदर्श महाराष्ट्रात आणि देशात असू शकत नाही.” यानंतर पत्रकारांनी भाजपचे राष्ट्रीय पत्रकार सुधांशु त्रिवेदी यांनी महाराजांबद्दल केलेल्यासंदर्भात विचारल्यावर फडणवीस म्हणाले, “सुधांशु त्रिवेदी यांचे वक्तव्य मी निट ऐकले आहे. कुठल्याही वक्तव्या त्यांनी महाराजांनी माफी मागितली, असे म्हटले नाही. जोपर्यंत सूर्य, चंद्र, तारे असेपर्यंत महाराष्ट्र आणि देशाचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराजच असणार आहेत. त्यामुळे मी असे मानतो की, यावर वाद होण्याचे कोणतेही कारण नाही. राज्यपालांनी जे काही बोलले आहेत. मी असे मानतो की, राज्यपालांच्या मनात काही स्पष्ट आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठा आदर्श कोणी असू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढू नका”, असे ते म्हणाले.

 

राज्यपाल नेमके काय म्हणाले

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. राज्यपालांनी कार्यक्रमादरम्यान म्हणाले, “तुमचा आदर्श कोण आहे. जेव्हा यापूर्वी विचाले जात होते. तेव्हा ‘जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी’, अशी उत्तरे दिली जात असत. परंतु, आता महाराष्ट्रात तुम्हाला आदर्श शोधण्याची गरज नाही, कारण इथे खूप आदर्श आहेत. यात छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी हे नव्या काळातील आदर्श आहेत.”

Exit mobile version