Site icon HW News Marathi

शिवसेनेच्या 12 खासदारांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री सायंकाळी घेणार पत्रकार परिषद

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीत आहेत. शिंदे हे राज्याच्या कॅबिनेटसंदर्भात चर्चा करण्यासाठी सध्या दिल्लीत आहेत. शिवसेनेच्या 12 खासदारांची शिंदेंची दिल्लीत भेट घेतली. या आमदारांच्या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मुख्यमंत्री नव्या गटनेतेपदाचे पत्र लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या 12 खासदारांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री हे आज (19 जुलै) सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. शिंदेंच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

शिंदे गटाचा वेगळा गट लोकसभेत स्थापन करायचा असेल तर शिंदे गटाला काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. परंतु, काही तासांपासून मुख्यमंत्री हे गेल्या 12 तासांपासून महाराष्ट्र सदनामध्ये आहेत.  मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवसेनेचे 12 खासदार लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत. लोकसभा अध्यक्षांना भेटून काही पत्र व्यवहार करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत 12 खासदार उपस्थित असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिंदे गटाने आज सकाळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे मावस बंधू आणि युवासेनेचे राज्य सचिव वरूण सरदेसाई यांची युवासेने पदावरून हकालपट्टी केली आहे. वरूण सरदेसाई यांच्या जागी किरण साळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात सध्या शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या सत्ता संघर्ष हा टोकाला गेला आहे. जर शिवसेनेचे 12 खासदार शिंदे गटात सामील झाले तर हा संघर्ष अजून भर पडेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 

Exit mobile version