Site icon HW News Marathi

कळवा-मुंब्रा पुलाच्या श्रेयवादावरुन जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्री आमने-सामने

मुंबई | सध्या राज्यात कळवा-मुंब्रा पुलावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यात श्रेयवादावरून हेवे-दावे सुरू आहेत.  कळवा-मुंब्रा पुल (kalwa-mumbra bridge inauguration) या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या तिसऱ्या खाडी पुलाचा आज (13 नोव्हेंबर) लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाला आहे. या पुलाच्या श्रेयावरून आव्हाड आणि मुख्यमंत्र्यांनामध्ये शब्दीक चकमकी आणि टीकास्त्र सोडले जात आहेत. ‘कळव्यातील एकून एक माणसाला माहिती आहे की, हे काम जितेंद्र आव्हाडांनी केलेले आहे. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’, असे म्हणत आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. आव्हाडांच्या टोल्याला मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले, “बेगाना नाही या राज्याचा मुख्यमंत्री उद्धघाटन करणार आहे,” असे म्हणाले. . पण, या पुलाच्या लोकार्पण सोहळ्यात दोन्ही नेते एकाच मंचावर उपस्थित होते.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “बॅनर कुठेही लागू देत, कळव्यातील लोकांच्या हृदयावर कुठला बॅनर आहे तो महत्वाचा आहे. कळव्यातील एकून एक माणसाला माहिती आहे की, हे काम जितेंद्र आव्हाडांनी केलेले आहे. पत्रकारांनी श्रेयासंदर्भात विचारल्यावर पुढे आव्हाड म्हणाले, “आम्ही श्रेयाची लढाई घईला जात नाही. मी माझे पोस्टरही लावलेले नाही. मी माझे बॅनरही लावलेले नाही. जी जनता आहे, ही हे सब जाणती है. मला कधी हिंदी सिनेमातील काही गाणे हे त्या त्या कार्यक्रमावर फिट बसतात. एक गाणे आहे, ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्याना टोला लगावला.

सगळ्यांच्या प्रयत्नातून प्रकल्प होतात, मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

आव्हाडांच्या टोला लगावल्यावर मुख्यमंत्री प्रत्युत्तर देत म्हणाले, “बेगाना नाही या राज्याचा मुख्यमंत्री उद्धघाटन करणार आहेत. हा सर्व खर्च महापालिकेना केला आहे. त्यांच्या व्यैक्तिक खर्चातून हा प्रकल्प झालेला नाही. आमदार, खासदार आणि महापौर प्रयत्न सगळेच करतात. त्यामुळे सगळ्यांच्या प्रयत्नातून प्रकल्प होतात. परंतु, प्रकल्प करण्याची दानत आणि इच्छा शक्ती लागते. ती इच्छा शक्ती आमच्याकडे  आहे. म्हणून ठाण्यामध्ये अनेक प्रकल्प आम्ही सुरू केलेले आहेत. आणि आम्ही कधीच दुजाभाव केलेला नाही. या मतदारसंघात कुणाचा आमदार आहे, असे करून कधी केलेले नाही. म्हणून कोट्यावधी लोकांची कामे, सर्व महापालिका हद्दीत केलेली आहेत. त्यामुळे लोकांना माहिती आहे. कौन किसकी शादी में जा रहा है, हे सगळ्यांना माहिती आहे.”

 

 

 

Exit mobile version