Site icon HW News Marathi

“सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री झाले पाहिजे का?”, मुख्यमंत्र्यांचे टीकास्त्र

मुंबई | “सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री झाले पाहिजे का? असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray,) यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री हे आज (20 सप्टेंबर) जळगाव दौऱ्यार असून त्यांनी मुक्ताईनगरमध्ये घेतलेल्या जाहीर सभेतून उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, “जळगावात गुलाबराव पाटील यांचे मोठे प्रस्थ असून त्यांना हिणवले जात आहे. पण, त्यांना कोणीही हिणवण्याचे काम करू नये. मी स्वत: शेतकऱ्यांचा मुलगा असून मी आज मुख्यमंत्री झाला आहे. परंतु, हे विरोधकांना चालत नाही. सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री झाले पाहिजे का?, असा सवाल उपस्थित करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना पुढे नेहत आहोत.”

झोपेचे सोंग घेतलेल्यांना केस जागे करणार?, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

“बाळासाहेब ठाकरे आणि मोदीचा फोटो लावून निवडणूक जिंकलो. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडत बरोबर केले असून झोपेचे सोंग घेतलेल्यांना केस जागे करणार?, आम्ही चूक सुधारली म्हणून गद्दार कोण?,” असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “आमदार आणि खासदारांची कामे होत नाही. आता ती कामे आम्ही दोन महिन्यात केली आहेत.”

 

 

 

Exit mobile version