Site icon HW News Marathi

“आमच्यासोबत 12 नाही तर एकूण 18 खासदार,” एकनाथ शिंदेंचा दावा

मुंबई | “आमच्यासोबत 12 नाही तर एकूण 18 खासदार आहेत, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला आहे. शिंदे काल (18 जुलै) दिल्लीत दाखल झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कॅबिनेटच्या चर्चेसाठी दिल्ली गेले आहे. शिंदे गटाची काल  ट्रायंडन हॉटेलमध्ये बैठक पार पडली. यानंतर शिंदे गटाने राष्ट्रीय कार्यकारणी यादी जाहीर केलेली आहे. शिंदे गटाची काल 12 खासदारांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्यांची माध्यमातून माहिती मिळला आहे. शिवसेनेचे 19 खासदारांपैकी 18 खासदार आपल्यासोबत असल्याचा दावा,  शिंदेंनी काल रात्री दिल्लीला पोहोचल्यानंतर माध्यमांशी बोलताना केला आहे.

शिंदे हे आज (19 जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्यातील कॅबिनेटसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेवर 20 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्यात काल राष्ट्रपती पदाची निवडणुकीसाठी मतदान झाले. यानंतर शिंदे गटाच्या काल झालेल्या बैठकीत 12 खासदारांनी ऑनलाइन हजेरी लावल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे.

शिंदेंनी पक्षासोबत बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला. परंतु, शिंदेंची शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचा दावा त्यांनी वारंवार केला आहे. शिंदेंनी भाजपसोबत हात मिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केले. शिंदे गटाने विधान भवनात 40 आमदार त्यांच्यासोबत आहे. नुकतेच ठाणे, कल्याण-डोबिंवली मधील आजी-माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

 

 

Exit mobile version