Site icon HW News Marathi

“मुख्यमंत्री म्हणजे, आकाशाला हात लागले…”, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई | “मुख्यमंत्री म्हणजे, आकाशाला हात लागले. एक पेन चालविला की संपले”, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला आहे. हिवाळी अधिवेशनाचा आजचा (30 डिसेंबर) शेवटाच दिवस होता. अधिवेशनाच्या समारोप दिवशी सत्तधारी आणि विरोधकांमध्ये दुफान फटकेबाजी सुरू होती. मुख्यमंत्र्यांनी आज महाविकास आघाडी खास करून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरेंवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले, “मी हे ही सांगू इच्छितो की, त्यावेळी त्यांनी ( उद्धव ठाकरे) काही सोडले नाही. मुख्यमंत्री पदाची हवा ऐवढी होती. मुख्यमंत्री म्हणजे, आकाशाला हात लागले. एक पेन चालविला की संपले, असे नाही होत. त्यावेळी मला आठवितेय, देवेंद्रजी इकडे बसलेले आहेत, त्यांना देखील अडकविण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. टास्क दिले हे करायचे आहे म्हणून काय कशी सत्ता तुम्ही राबवित होते दादा?, असा सवाल त्यांनी भरसभागृहात अजित पवार यांना केला. मुख्यमंत्री पुढे म्हटले, तुम्ही वैयक्तिक आपल्यावर घेऊ नका. मी कोणत्याही अधिकाऱ्याचे नाव घेत नाही. आमच्या संकट काही लोकांच्या चौकश्या लावण्याचे काम पाप त्यावेळी केले होते. अजित पवारांकडे पाहून मुख्यमंत्री म्हणाले, तुम्ही म्हणालात सत्तेची मस्ती तेव्हा ती सत्तेची मस्ती नव्हती का दादा?, असा सवाल त्यांनी केला.

तुमचे दोन मंत्री जेलमध्ये गेले, तेव्हा तुम्ही त्यांचे राजीनामे मागितले का?

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “आम्हाला तुम्ही फक्त सांगताय, ही सत्तेची मस्ती ऐवढी नसावी. मग, तेव्हा कोणती मस्ती होती. आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कोणी विचारावा. ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला. ज्यांचा दाऊदसोबत संबंध असलेला मंत्री जेलमध्ये गेला. त्यांनी आम्हाला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न विचारावा, असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला. ते पुढे म्हणाले, “तुम्ही प्रश्न विचारा, पण त्याआधी पार्श्वभूमी देखील तुम्ही पाहा, तपासा. आम्ही सगळे ऐकायला तयार आहोत. आणि म्हणून जेव्हा आम्हला कळाले की हे सगळे असे असे होतय. त्यावेळेस ती संधी आम्ही त्यांना दिली नाही. पूर्ण तकतच पलटून टाकले. हे असेच नाही झाले दादा. आमच्या किती लोकांचे राजीनामे मागितले. तुमचे दोन मंत्री जेलमध्ये गेले, तेव्हा तुम्ही त्यांचे राजीनामे का नाही घेतले. तेव्हा का नाही हिम्मत दाखविली. तुम्ही हिम्मत दाखवायला पाहिजे होती.”

बाळासाहेबांनी एकदा दिलेला शब्द कधी मागे घेतला नाही

“त्यावेळी काही लोकांनी म्हटले की आम्हाल मुख्यमंत्री पद सोडतो. मला सत्तेचा मोह नाही आणि आमदारकीही सोडतो, असा चिमटा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात काढला. आणि म्हणून बाळासाहेबांनी एकदा शब्द दिला, त्यांनी कधी मागे घेतला नव्हता. एकदा बंदुकीतून गोळी सुटली म्हणजे सुटली”, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. “आम्ही सहन करतोय म्हणून तुम्ही काही बोलाल, तर आम्ही सहन करणार नाही. आम्ही पण महनत केलेली आहे. त्यांनी पण जिवाचे राण केलेले आहे. रात्रीचा दिवस केलेला आहे. रक्ताचे पाणी केलेले आहे. आणि संघटना मोठी केलेली आहे. आम्ही खसता घाललेल्या आहेत. कुटुंबावर घरादारवर तुळशीपत्र ठेवून पुढे आलेले आहे. त्यामुळे बोलताना प्रत्येकाने विचारपुर्वक बोलल पाहिजे,” असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला.

 

 

 

Exit mobile version