Site icon HW News Marathi

“अडीच वर्षांपूर्वी शिवसेना-भाजपा युतीचे…” मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत

शिवशंकर निरगुंडे । “अडीच वर्षांपूर्वीच हे सरकार स्थापन व्हायला होते”, अशी खंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हिंगोली दौऱ्यादरम्यान व्यक्त केली. मुख्यमंत्री हे काल (८ ऑगस्ट) मराठवाडा दौऱ्यावर होते.त्यांनी काल विविध भागातील पाहणी करत व काही कार्यक्रमांना हजेरी लावत हिंगोली येथील कावड यात्रेला हजेरी लावून शहरातील गांधी चौक येथे आयोजित सभेत जनतेला संबोधित केले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी यांनी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांचे तोंड भरून कौतुक केले आहे. त्याचबरोबर संतोष बांगर हा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा ढाण्या वाघ आहे.असे म्हणून तोंड भरून कौतुक केले आहे.भाषण सुरू होण्यापूर्वी व्यासपीठावर धनगर समाज, बंजारा समाज,यांच्यासह इतर समाज बांधव पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री यांचा सत्कार केला.
दरम्यान, सोबतच टीका करणाऱ्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगला समाचार घेतला आहे.विरोधकांना आपण आपल्या कार्यातून उत्तर देणार आहोत.ती जातोय तिथे हजारोंच्या संख्येने नागरिक सत्कार करण्यासाठी रस्त्यावर येत आहेत. स्वर्गीय बाळा साहेबांचे स्वप्नातला हे सरकार आहे. अडीच वर्षांपूर्वीच हे सरकार स्थापन व्हायला होतं.शिवसेना भाजपा युतीसाठी जनतेने भरभरून मतदान दिलं होतं, सेना भाजप युतीचे सरकार होईल जनतेचे अपेक्षा होती.ज्या लोकांनी बाळासाहेबांना जवळ उभं केलं नाही त्यांच्यासोबत सरकार स्थापन केलं होत दुर्दैव आहे.आम्ही बाळासाहेबांची विचार पुढे नेण्याचं काम करतोय, हिंदुत्व पुढे नेण्याचं काम करतोय. आपण पाहिलं असेल तर पहिल्यांदा इतिहास घडला, दर खासदारांची टक्केवारी पाहता आमचा निर्णय योग्य आहे.बांगर हा एकनाथ शिंदे चा आवडता चेहरा.सत्ता स्थापनेच्या काळात तो एका एका आमदाराला पाठवत होता.मग उठून तो योग्य वेळेला आला.आता हे सर्व सामान्य जनतेचे सरकार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा राज्याला विकासासाठी काही कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले आहे.
राज्यात आतापर्यंत एकाही सरकारने मदत केली नाही एवढी मदत अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांना करणार. त्याचबरोबर नरसी नामदेव औंढा नागनाथ, पोरा देवी,माहूरगड, गुरुद्वारा नांदेड या देवस्थान व तीर्थक्षेत्रांचा पर्यटन क्षेत्रांचा विकास करणार असून बेरोजगारांना सुद्धा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची त्यांनी आश्वासन दिले आहे.
 
 
Exit mobile version