HW News Marathi
राजकारण

विनायक मेटेंच्या अपघाताची CID चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

मुंबई | शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे अपघाती निधन झाले. या दुर्घटनेनंतर मेटेंचा अपघाती मृत्यू की घातपात यावर  संशय उपस्थित केल्या जात होत्या. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेत पोलीस महासंचालकांना  विनायक मेटेंच्या अपघाताची सीआयडी (CID) चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणाची विनायक मेटेंची पत्नी ज्योती मेटेंनी सुद्धा संशय व्यक्त केला होता.

 

दरम्यान, विनायक मेटेंचे निकटवर्तीय अण्णासाहेब मायकर अपघातबद्दल धक्कादायक खुलासा केला होता. या विनायक मेटेंच्या निधनानंतर मायकरांचा ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपनुसार,  मधून 3 ऑगस्ट रोजी देखील मेटेंच्या गाडीला अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मायकरांनी धक्कादायक खुलासा ऑडिओ क्लिपमध्ये केला. यानंतर ज्योती मेटेंनी एबीपी माझाशी बोलताना म्हणाल्या, “मी आताच व्हायरल होत असलेली ओडिओ क्लिप ऐकली असून अण्णासाहेब मायकर यांच्याशी माझे बोलणे झाले असून त्यांचे म्हणाले की, समोरच्या गाडीवर आपली गाडी नेऊन आदळावी, अशा पद्धतीने ती गाडी ओव्हरटेक करण्यात आली होती. ही बाब खरत आक्षेपार्ह्य होती. यामुळे संपूर्ण प्रकरणाची चौकशी ही झाली पाहिजे. 3 ऑगस्ट रोजी असाच प्रकार घडल्याचे अण्णासाहेबांनी सांगितले आहे. या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे.” ज्योती मेटे पुढे म्हणाल्या, “मला सुद्धा यात संशय वाटत आहे. मेटेंचा अपघात झालेली गाडी आणि तीन तारखेला वापरलेली गाडी यांची चौकशी झाली पाहिजे.”

 

विनायक मेटेंचे रविवारी (14 ऑगस्ट) अपघाती मृत्यू झाला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ विनायक मेटेंच्या गाडीला अपघात झाला होता. या अपघातात विनायक मेटे गंभीर जखमी झाले होते. विनायक मेटेंना जखमी अवस्थेत कामोठेतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आल होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी विनायक मेटेंना मृत घोषित केले.

गाडीला असा झाला अपघात
विनायक मेटे हे  फोर्ड Endeavour MH 01 DP 6364 या गाडीने मुंबईकडे निघाले होते. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या दुसऱ्या लेनने जाणाऱ्या कार चालकाचा त्यांच्या कारवरची ताबा सुटून पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला ठोकर मारून अपघात झाला आहे. सदर अपघातात आमदार विनायक मेटे हे अत्यंत गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ आयआरबी ॲम्बुलन्स एमजीएम रुग्णालयात कामोठे येथे उपचारा कामी दाखल केले असता डॉ.धर्मांग यांनी तपासून मयत घोषित केले आहे. व बाॅडीगार्ड पोलिस हवालदार राम ढोबळे हे कारमध्ये अडकल्याने कारमधून बाहेर काढून आय आर बी रुग्णवाहिकेने तात्काळ एमजीएम रुग्णालय,कामोठे येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. कार आयआरबी क्रेनच्या साह्याने रस्त्याचे बाजूला घेतली आहे. सदर वेळी आम्ही व PSI चव्हाण साहेब तसेच रसायनी पोलीस स्टेशन सहायक पोलीस निरक्षक बालवडकर व स्टाफ तसेच भारतीय राखीव दलाचे नवनाथ गोळे आणि स्टाफ हजर होते. या अपघातानंतर ट्रक चालक हा फरार झाला असून पोलीस ट्रक चालकाचा शोध घेत आहेत.

 

संबंधित बातम्या

अण्णासाहेब मायकर व्हायरल ऑडिओ क्लीपवर विनायक मेटेंच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया

विनायक मेटे अनंतात विलीन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतले अंत्यदर्शन

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मॉब लिंचिंगविरोधात मोदींना पत्र लिहिणाऱ्यांना ६१ प्रतिभावंतांनी दिले उत्तर

News Desk

केंद्रीयमंत्री अनंत कुमार यांचे निधन

News Desk

तुम्ही ‘त्यांनी’ दिलेले पैसे घ्या, मात्र मत ‘आप’लाच द्या !

News Desk