Site icon HW News Marathi

शासन कांदा उत्पादकांच्या पाठीशी ठामपणे! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई | “कांदा उत्पादकांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून नाफेडकडून कांदा खरेदी सुरु झाली आहे”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज सकाळी विधानसभेत बोलताना सांगितले. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (maharashtra budget session) दुसऱ्य दिवशी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आमदारांनी कांद्याच्या माळा आंदोनल केले. यानंतर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विधानसभेत  सरकारने शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर तातडीने सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चा करावी, अशी मागणी सभागृहात केली.

मुख्यमंत्री आपल्या निवेदनात म्हणाले की, “हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देणारे आहे. आम्ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषापेक्षा जास्त मदतही केली आहे. नाफेडला अतिरिक्त कांदा खरेदी करण्याची विनंती केली होती, त्याप्रमाणे खरेदी सुरु झाली आहे. २.३८ लाख मेट्रिक टन कांदा आत्तापर्यंत खरेदी झाला आहे. जिथे खरेदी केंद्र बंद असेल तिथे सुरु करण्यात येईल . कांदा निर्यातीवर देखील बंदी नाही. त्यामुळे कांदा शेतकऱ्यांना सुद्धा आवश्यकतेनुसार मदत जाहीर करण्यात येईल”, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यातला कांदा, कापूस, सोयाबीन, हरभरा, द्राक्ष उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. त्यांचा माल कवडीमोल दराने विकला जात आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर तातडीने सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चा करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली.

 

अजित पवार सभागृहात नेमके काय म्हणाले

“कांदा उत्पादक शेतकऱ्याला तर दोन रुपये चेक दिल्याची बाब आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून दिली आहे. राज्यसरकारने यावर तातडीने हस्तक्षेप करुन नाफेडसारख्या संस्थांना शेतमाल खरेदी करण्याच्या सूचना द्याव्यात तसेच केंद्र सरकारशी समन्वय साधून हे प्रश्न मार्गी लावावा”, असेही अजित पवार म्हणाले.

 

Exit mobile version