Site icon HW News Marathi

“तुम्ही सिलेक्टीव्हच ऐकता…”, मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना टोमणा

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी हिवाळी अधिवेशनात विदर्भासाठी घोषणा जाहीर केल्या. यावेळी विधानसभेत मुख्यमंत्री बोलतान असताना विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या टोलेबाजी झाल्याचे पाहायला मिळाले. “तुम्ही सिलेक्टीव्हच ऐकता”, असा टोला मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना लगावला. हिवाळी अधिवेशनात (Winter Session) विदर्भासाठी राज्य सरकारकडून कोणत्याही योजनांची घोषणा केली नाही, असा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (29 डिसेंबर) पत्रकार परिषद घेऊन केला.

 

मुख्यमंत्री म्हणाले, “आता तुम्ही असे बोलयला लागलात, आमच्यामध्ये फुट पाडायाचा प्रयत्न केला. तर कसे मिटिंग होणार, आणि तुम्ही कितीही प्रयत्न केले, तरी मी तुमच्या चेहऱ्याकडे बघत होतो. तुम्ही मी जे बोलत होतो, तुम्हाला वाटलेच नव्हते. विदर्भामध्ये ऐवढ्या मोठा घोषणा होतील. विदर्भवासियांना आपण पैसे देऊ, आणि मी बघत होतो. दादा तुम्ही आता बघा, तुम्ही आता तिकडे बघायला लागले. म्हणजे तुम्ही सिलेक्टीव्हच ऐकता. बरोबर माझे लक्ष होतो, प्रत्येक वेळाला का टाळ्या वाजवता, समजले पाहिजे की, कधी आणि कुठल्या वेळेला वाजवायच्या बरोबर सगळे समजदार आहेत. जेव्हा बरोबर निर्णय होईल, तेव्हा वाजवायचे. आणि मी इथे बाजूला बसलोय, उपमुख्यमंत्र्यांच्या हातावर पण माझे लक्ष होते. ते बरोबर वाजवित होते, मुख्यमंत्र्यांनी असे म्हटल्यानंतर विधानसभेत हशा पिकल्ला.

 

आमचे सरकार सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे सरकार

 

उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर आरोपवर मुख्यमंत्री सभागृहात म्हणाले, “आणि दुसरी गोष्टी किती काही गेले तरी सुद्धा बाहेर पण, जे काही प्रयत्न सुरू आहेत. ते कुठली प्रकरण कोणी दिली. भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना हे जे बाहेर सुरू आहे. यामुळे आमच्यावर काही परिणाम होणार नाही दादा. एका भूमिकेतून आम्ही सरकार बनविले आहे. आमचे हे सरकार सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे सरकार आहे. यामुळे आमच्यावर काही परिणाम होणार नाही. आम्ही दोघेही एकच आहोत. फक्त काय नावे घेत नाही मी, परंतु, किती काही म्हटले तरी सुद्धा आमच्यासमोर उद्देश ऐवढाच आहे. या विदर्भ आणि मराठ वाड्याला  न्याय मिळाला पाहिजे. आम्ही पहिल्याच अधिवेशनामध्ये दादा भरुन काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यामुळे ते कसे क्रेडिट सरकारला मिळू नये, असा तुमचा प्रयत्न होता. पण, तसे करू नका, बाकी लोकांचे सोडा काय बोलतात ते. पण, तुम्ही खऱ्याला खरे चांगल्याला चांगले म्हणारे आहात. मग, दादा तुम्ही असे का ? “, असा सवाल त्यांनी अजित पवारांना केला आहे.

Exit mobile version