Site icon HW News Marathi

मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचा सांगितला ‘तो’ गंमतीदार किस्सा

मुंबई | राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तुफान फटके बाजी केली. मुख्यमंत्र्यांनी आज (25 ऑगस्ट) 2019 मध्ये विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि राज्याचे उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीचा किस्स्यावरून सांगितला. या पहाटेच्या शपथविधीवरून मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.

मुख्यमंत्री म्हणाले, “गेल्या अडीच वर्षात आपण महाविकास आघाडीची बांधली होती मुठ मुख्य बसले होते घरी, तुम्ही चालवित होतात. बोट, तुम्ही मला सबुरीचा सल्ला देखील दिला आहे. आपण जे केले ते उघडपणे केले. मी तुम्हाला एकच सांगतो की, श्रद्धा, सबुरीने आम्ही वागत आहोत. आमच्यावर बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत तर आनंद दिघेसाहेबांवर श्रद्धा आहे. तुमचे वागणे, वेळापत्रक याविषयी आम्ही सगळीकडे बोलत असतो. दादा सकाळी सगळीकडे वेळेवर येतात. तुम्ही मला एकदा सकाळी 8 वाजता पुण्याला बोलविले. मी आता आठ वाजता कसा येऊ. मी झोपतोच चार वाजता. त्यामुळे मी तुमच्याबद्दल मला आदरही आहे. आणि आम्ही श्रद्ध आणि सबुरीने काम केले आहे. तुम्ही त्यावेळी सकाळी थोडीशी घाई केली. तुम्ही थोडे सबुरीने घेतले असते तर कार्यक्रम करेक्ट झाला असता. मला आठविते, दादा, जयंतराव त्यावेळी मला बोलले होते. चुकीचा कार्यक्रम झाला, मला माहिती दिली असती तर करेक्ट कार्यक्रम केला असता. त्यामुळे तुम्ही थोडीशी घाईल केली.”  यावेळी सभागृहात एकच हर्षा पिकला होता.

मुख्यमंत्र्यांनी पवार आणि फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधीचा किस्सा सांगितला

आणि गंमत सांगतो, त्यावेळी मला एक फोन आला. आमच्या प्रमुखांचा आणि ते म्हणाले की, तू टीव्ही बघितली का?, असा प्रश्न विचारला होता. मी म्हणालो, टीव्हीत फक्त दादा दिसत आहे, ते तिकडे शपथ घेत आहेत. मी म्हटले हे मागचे कधीचे दाखवत आहेत की काय? नाही हे आताचे आहे. तिकडे फडणवीस पण दिसले. आणि मला फोन केला, मला बोलले अरे काय चालले, आमचे प्रमुख म्हटले, बघतोय मी. ते म्हटले, मी जयंत पाटलांनाही फोन करतोय, ते फोन उचलत नाहीत. त्यांना म्हटलं जयंत पाटीलही तेथेच आहेत. कारण तेथे अनिल पाटील आहेत ना. हे तिकडे होते,  अनिल पाटील तेथे पाठमोरे होते. मी बघितले की, जयंतराव पण इकडे आहेत. मी सांगितले की, जयंतराव पण गेलेत. पण, ते म्हणाले, नाही नाही, जयंतराव गेले नाहीत. पण ते फोन उचलत नाही. तुम्ही नव्हता इतके, तुम्ही असता तर ते असते तर कार्यक्रम करेक्ट झाला असता. ओके झाला असता,”

 

 

 

Exit mobile version